Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याचे कपाशीच्या पिकांच्या शेतात बेकायदेशीररीत्या केली गांजाचे झाडांची लागवड
सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याचे कपाशीच्या पिकांच्या शेतात बेकायदेशीररीत्या केली गांजाचे झाडांची लागवड
नंदुरबार प्रतिनिधी: नंदुरबार - जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थांचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे खुप संवेदनशील असून गांजा,अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड करणा-यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक व लागवड यांचेवर कारवाई करणेसाठी त्याबाबतची माहिती घेत होते.
दिनांक 16/10/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याचे कपाशीचे पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी सांगितली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ व त्यांचे अमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी फेस बामखेडा गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले, पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला.स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यास पाठलाग करून जंगलात पळुन जाणाऱ्या इसमाला पकडण्यात यश आले. पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश हिरालाल शिरसाठ वय 32 वर्षे राहणार बामखेडा ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले.
पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले,म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे 50 किलो 315 ग्रॅम वजनाचे 3 लाख 52 हजार 205 रुपये किंमतीची एकुण 25 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला. तसेच आरोपी नामे राकेश हिरालाल शिरसाठ वय 32 वर्षे राहणार- बामखेडा ता. शहादा जि. नंदुरबार याचेविरुद् सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 187/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, सपोनि श्री. संदीप पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिरसाट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, विकास कापुरे, पोलीस अमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके फॉरेन्सीक टीमचे पोलीस अंमलदार दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी,सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शानाभाऊ ठाकरे,विजय गावीत यांचे पथकाने केली असुन मा.पोलीस अधीक्षक,नंदुरबार श्री.पी.आर.पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक,सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो.तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा