Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

रात्री पडलेल्या अवकाळी वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांच्या शेत शिवार पहाणी मोहिम



शिरपूर प्रतिनिधी:आज रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील भाटपुरा शिवारातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहेत.हे नुकसान पाहणी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली शेतकऱ्यांना धीर दिला. कापूस, मका, ऊस यासारख्या पिकांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून कापूस सारख्या पिक शेतकऱ्याच्या तोंडी आले असता या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचं हे घास होडून नेले आहे. 


अनेक शेतकऱ्यांची मके ऊस या वाऱ्यांमुळे अक्षरशःजमिनीवर पडली आहे. अशा वेळेस आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की या सर्व शेतकऱ्यांची शेतात पाहणी होऊन पंचनामे व्हाव्यात, नुकसान भरपाई व्हावीत अशी तहसीलदारांना निवेदन देत आहोत. शासकीय निकषांमध्ये शेतकऱ्यांना सवलत द्यावी हे देखील मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत.

यावेळेस शेतकरी वसंत नारायण पाटील,राजेंद्र मिठाराम करण का, बन्सीलाल आगरचंद जैन, भिकन खंडेराव पाटील, बाळू भिला राठोड, मोतीलाल रामचंद्र दोरीक,अण्णा मंगा राठोड,जीवनदास पाटील, मिश्रीलाल महादू कोळी, भगवान देवरे सुनील भिल शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विभा भाई जोगरांना, उपजिल्हा युवा अधिकारी अनिकेत जी बोरसे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष
जितेंद्र पाटील, पिंटू शिंदे,विजय चव्हाण उपतालुका अधिकारी युवासेना जितेंद्र राठोड ,राजेसिंग राठोड आधी शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध