Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सह मंत्र्यांचे धोबी समाजातर्फे आभार मंत्रालयात संत गाडगे बाबा व दशसुत्री संदेश फलक लागला एकनाथराव बोरसे,अरुण धोबी यांचे प्रयत्न
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सह मंत्र्यांचे धोबी समाजातर्फे आभार मंत्रालयात संत गाडगे बाबा व दशसुत्री संदेश फलक लागला एकनाथराव बोरसे,अरुण धोबी यांचे प्रयत्न
शिरपूर : मंत्रालयात मुख्य प्रवेशव्दारावर दि. 3 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबांचा फोटो व दशसूत्री संदेश फलक त्याच जागी पुन्हा लावण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आला असून राज्यभारातील परिट (धोबी) समाजाच्या विविध संघटनांच्या प्रयतत्नांना यश आले आहे. मंत्रालयाच्या प्रवेशव्दारा वरील खांबावर संत गाडगे बाबांचा फोटो व दशसूत्री लावली होत. काही दिवसांपासून फलक काढण्यात आलेला होता.दि.28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात आखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, ठाणे जिल्हाध्यक्ष धनराज खैरनार यांनी निवेदन देऊन त्यांच्या सचिवांशी चर्चा केली होती. तो फलक पुर्णवत लावावा अशी मागणी करण्यात आली होती.
वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, ग्रामीण विकासमंत्री ना. गिरीष महाजन, सहकार मंत्री ना.अतुल सावे, बंदरे, खनिकर्म मंत्री ना.दादा भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देण्यात आले होते.तसेच त्यावर मंत्री महोदयांनी तीन, चार दिवसात संत गाडगे बाबा यांचा संदेश व फोटो असलेला फलक लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्या नुसार मंत्री महोदय यांनी दिलेला शब्द पुर्ण केला असून दि. 3 ऑक्टोंबर रेाजी मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावरील खांबावर संत गाडगे बाबांचा फोटो व दशसूत्री संदेश लावण्यात आले आहे.
त्यामुळे राज्यातील धोबी समाज व संत गाडगे बाबा प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस, वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन, बंदरे खनिकर्म मंत्री ना. दादा भुसे आदी मंत्र्यांचे धोबी (परिट) समाजातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा