Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

भिल्ल आदिवासी समाजाला शिवीगाळ करणाऱ्या आमदार जयकुमार रावल वर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल



धुळे, दोंडाईचा-प्रतिनिधी:दसऱ्याच्या दिवशी रावण  दहनाच्या कार्यक्रमांतर्गत आमदार जयकुमार रावल व आदिवासी बांधवांमध्ये मतभेद झाला त्यात आमदार जयकुमार रावळ यांनी आदिवासी समाजाला साले भिल्ल असा उल्लेख करून तसा व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल होत होता.त्याचप्रमाणे पुढे आमदार जयकुमार रावळ यांनी जाहीर रित्या सांगितले की साले आदिवासी भिल्ले तुमची औकात नसून माझ्यापर्यंत पोहोचले कसे, यांची माझ्या चपलेच्या धुळाची एवढी देखील लायकी नाही असे बोलून आदिवासी समाजाला हिंद दर्जाची शब्द वापरून शिवीगाळ केली तसेच पोलीस यंत्रणांकडून जर यांच्या बंदोबस्त होत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो तसेच आदिवासी समाजाला हिंन दर्जाचे हिनवण्याचे काम करून, जाती पुरस्कृत शब्द वापरून साले तुम्हाला सोडणार नाही असे सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला त्या अंतर्गत भाग सहा गुन्हा रजिस्टर नंबर ३०४/20२२ नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 
3 (1) (आर)( एस) व भादवि कलम 506 प्रमाणे दिनांक 7/10/2022 रोजी रात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी आमदार जयकुमार रावल, जितेंद्रसिंह सरकारसाहेब रावल,माजी नगरसेवक निखिल रवींद्र जाधव,नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी,रामकृष्ण मोरे,मांडळ, नारायण बाजीराव पाटील,प्रवीण हरी महाजन, नरेंद्र भाऊसाहेब राजपूत तसेच समितीचे आयोजक 15 ते 20 जणांवरती फिर्यादी अंकुश मंगलसिंग नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल रात्री उशिरापर्यंत झाला.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की रावण दहनाचा कार्यक्रमा वरून वाद निर्माण झाल्याने आमदार जयकुमार रावळ यांनी त्यांच्या संस्थेची एक कर्मचारी रामनाथ भगवान मालचे यांच्या द्वारे फिर्याद देऊन खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल केला त्यात डॉक्टर हेमंतराव देशमुख,रवींद्र देशमुख,अमित पाटील, आदिवासी समाजाचे नेते रवींद्र जाधव, माजी नगरसेवक नंदू सोनवणे,भारत जाधव यांचा काही एक संबंध नसताना राजकीय दळपणापोटी सत्तेच्या दुरुपयोग करून ज्याप्रमाणे या अगोदर देखील अशा खोट्या केसेस दाखल केल्या होत्या त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भादवि कलम 153 अ, 295 अ, 147 तसेच 37(1)3,4  चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने डॉक्टर हेमंतराव देशमुख यांच्या सह आदिवासी समाज संतप्त झाला होता.कारण की 2007/2008 मध्ये देखील दोंडाईचा शहरातील टेक भिलाटीत गर्ल्स हायस्कूलला लागून आदिवासी समाजाच्या वस्तीच्या ठिकाणी तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे हे आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारची घरकुल योजनेमार्फत भव्य दिव्य घरकुल योजना बनवीत असताना आमदार जयकुमार रावळ यांनी आणि त्यांचे वडील सरकारसाहेब रावळ यांनी ते घर आदिवासींना मिळू नयेत म्हणून अडथळा निर्माण करून हाय कोर्टात केस दाखल केली होती आणि आदिवासी बांधव पक्क्या हक्काच्या घरात राहू नये या भावनेने अडथळा निर्माण केला होता. तो देखील राग आदिवासी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होता आणि आता देखील अशा पद्धतीने आदिवासींवर खोटी केस दाखल केल्या संदर्भात आदिवासी भिल्ल समाज संतप्त होऊन 400 /500 आदिवासी बांधव महिलां सकट पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेलीत जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जयकुमार रावळांवरती गुन्हा दाखल केला नाही व कायदेशीर रित्या कारवाई न केल्यास नाईलास्तव  आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आम्ही जशास तसे याप्रमाणे उत्तर देऊन राऊळ गडीवरच हल्ला करू असा पवित्रा घेतल्याने अखेर रात्री उशिरा आमदार जयकुमार रावल व त्यांचे वडील सरकारसाहेब राऊळ यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 शिंदखेडा मतदारसंघात यापूर्वी अशाच अनेक प्रकारच्या खोट्या केसेस आमदार जयकुमार राउळ यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्या होत्या त्याची संतप्त सुप्त भावना अनेक वर्षापासून लोकांच्या मनात होत्या आणि चीळ देखील निर्माण झाली होती.

परंतु जयकुमार रावळाच्या ताकतीपुढे संघर्ष करेल कोण, पहिले पाऊल उचलेल कोण असे अनेकांच्या मनात खदखदत होते कारण की डॉक्टर देशमुख बंधू यांच्यासह अनेकांवरती अनेक खोट्या केसेस दाखल करून जयकुमार रावल यांनी तालुक्यात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे विरोध करण्यास कोणीही पुढे येत नव्हते.परंतु एकलव्य समाजाचे अनुयायी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे मर्द भिल्ल समाजाने अखेर जयकुमार राउळ यांच्या दहशतीला लगाम लावला आणि खोटी केस दाखल करणाऱ्या जयकुमार राऊळ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन सत्य परिस्थिती पोलीस स्टेशनच्या समोर आणली आणि जयकुमार रावल यानी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शांतता सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या प्रयत्न केल्या संदर्भात तसेच आदिवासी समाजाला शिवीगाळ केल्या संदर्भाची पुरावे देऊन अखेर रात्री उशिरापर्यंत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत तसेच भादवी कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

आठ वर्षाची अखंड कालखंडानंतर आमदार जयकुमार रावल यांना कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न या  माध्यमातून झालेला दिसतो या माध्यमातून आता आमदार जयकुमार राउळ यांची दहशत खपवून घेतली जाणार नाही आणि कोणावरही अन्याय केल्यास आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू असे आदिवासी एकलव्य भिल समाजाने जाहीर रित्या सांगितले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध