काल रोजी पंचायत समिती साक्री सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यात आली.या वेळीही महाविकास आघाडीने पंचायत समितीत सत्ता कायम ठेवली.या वेळी उपसभापती पदासाठी मा.पं स.सदस्य श्री.राजधर देसले (माऊली) यांच्या पत्नी सौ.अर्चना राजधर देसले पं.स.सदस्य यांचे नाव चर्चेत असतांना दिघावे कासारे गणातील सदस्यांना उपसभापती पद शिवसेना पक्षश्रेष्ठ्यांकडून देण्यात आले. माऊली श्री.राजधर देसले हे दिघावे कासारे गणातील रहीवाशी असून त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून स्वतःचे मतदान नसतांना म्हसदी गणात निवडणुक लढवून १९९ मताधिक्यांनी निवडुन आले.त्यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून माऊली श्री.राजधर देसलेंना पुढचे अडीच वर्ष आपणास उपसभापती देऊ असे ठरले होते. परंतू OBC आरक्षणाच्या मुद्द्यामुळे माऊलींचे पद संपुष्टात आले.परंतू त्यांची पद संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी स्त्री राखीव हे आरक्षण निघाले.त्यावेळीही माऊलींना तुमच्या पत्नींना उभे करा व निवडून आल्यानंतर उपसभापती पद देऊ हे शिवसेनेच्या वरीष्ठांकडून सांगण्यात आले.माऊली हे पहिल्यांदा उभे असतांना स्थानिक नेत्यांनी माऊलींना पाडण्यासाठी दिवसरात्र अतोनात प्रयत्न केलेत.पंरतु माऊली हे चांगल्या मतांनी निवडून आले.दुसऱ्यांदाही माऊलींच्या पत्नी सौ.अर्चना देसले निवडणुकीसाठी उभ्या असतांना तालुक्यात माऊलींचे वर्चस्व होऊ नये.म्हणून दुसऱ्यांदाही तालुक्यातील नेत्यांनी माऊलींच्या पत्नींना पाडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.परंतू माऊलींच्या पत्नी या १००० मताधिक्याने निवडून आल्या.ठरल्याप्रमाणे काल माऊलींच्या पत्नींचे नाव उपसभापती पदासाठी अग्रणीवर असतांना दिघावे कासारे गटातील सदस्यांना उपसभापती पद दिले.तसेच यावेळी पक्षश्रेष्ठींनी माऊलींना या सदस्याचा एका वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर माऊलींच्या पत्नी सौ.अर्चना देसलेंना देऊ हे सगळ्यांच्या संमतीने ठरविण्यात आले.या वेळी माऊली यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करून आपण परत शिवसेनेचा भगवा निष्ठेने आपल्या साक्री पंचायत समितीत फडकवू असे सांगितले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा