Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२
खर्दे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा.....
तालुक्यातील आर.सी.पटेल माध्य व उच्च माध्य.विदयालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे सर होते.सुरुवातीला ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.तदनंतर विद्यालयाचे शिक्षक ए.जे. पाटील यांनी डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कष्टमय, खडतर जीवनाच्या परिचय करून वाचनाचे महत्त्व सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे यांनी पुस्तक वाचनातून मानव कसा समृद्ध बनतो हे विविध उदाहरणे देऊन पटवून दिले तदनंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोधपर कथासंग्रह ,आदर्श व्यक्तींचे जीवन चरित्र पर पुस्तके वाचण्यात देण्यात आली.शिक्षक बंधू भगिनींनी अवांतर पुस्तकांचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.आर.जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन हितेंद्र देसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.बी.
धायबर ,अमोल सोनवणे,हितेंद्र देसले,ए.जे.पाटील,डी.एम.पवार, पी.एस अटकळे,बी.एस. बडगुजर,बी .एस.पावरा,सुनीता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम, मनीषा पाटील, युवराज मिठभाकरे,यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा