Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विना परवाना टु-व्हिलर विक्रेते व शोरुम धारकांवर कायदेशिर कारवाई होणेबाबत-तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल
शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विना परवाना टु-व्हिलर विक्रेते व शोरुम धारकांवर कायदेशिर कारवाई होणेबाबत-तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल
शिरपूर प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात अनधिकृतपणे विनापरवाना टू व्हीलर विक्रेते यांचा मोठा सुळसुळाट झालेला असल्याने धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर आता शिरपूर व शिंदखेडा या दोन तहसीलदारांकडे तक्रार अर्ज देण्यात येऊन तालुक्यातील अनाधिकृतपणे विनापरवाना वाहन विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्रकर्षाने खालील मुद्दे आहेत.
शिरपूर तालुक्यात केवळ तीनच अधिकृत परवाना धारक टु व्हिलर विक्रेते आहेत.तर शिरपूर शहरातील उर्वरित सुप्रभा मोटार्स बजाज - आंबिका नगर रोड, श्री दत्त कृपा होडा - शिरपूर फाटा, हिरो विमलनाथ-शिरपूर फाटा,भंडारी टीव्हीएस-आयोध्या कॉम्पलेक्स मांडळ रोड ही अनाधिकृतपणे विना परवाना सर्रास टु-व्हिलर विक्री करत आहेत.
तर शिंदखेडा तालुक्यात एकही टु व्हिलर विक्रेत्याकडे अधिकृत वाहान विक्रीचा परवाना नाही.मग शिंदखेडा शहरातील गरिमा अँटो हिरो-स्टेशन रोड शिदखेडा,श्री जी मोटार्स सर्विसेस बजाज-पाटण चौफुली, नरडाणा येथील निर्मलाई मोटार्स बजाज-आकांक्षा हॉटेल जवळ बेटावद सर्विस रोड नरडाणा,आकाश टि.व्ही.एस.मेन रोड नरडाणा इत्यादी टु-व्हिलर विक्रेते ही अनाधिकृतपणे विना परवाना ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली सर्रास वाहान विक्रीचा गोरख धंदा करीत आहेत.
या विनापरवाना वाहान विक्री करण्या-यांवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.त्यावेळी त्यांच्या शोरुम मध्ये व गोडाऊन मध्ये असलेली सर्व वाहाने जप्त करुन ती वाहाने त्यांनी कोठून आणलीत त्याबाबत त्यांचा लेखी खुलासा घेऊन विनापरवाना धारकास वाहान विक्रीसाठी पुरवठा करणा-या परवाना धारक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात यावा.व त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.
ही अनाधिकृत टु व्हिलर वाहान विक्रीचा व्यवसाय कोणत्या वर्षापासून सुरु असून आजपावतो विकलेल्या वाहानांची यादी मिळवण्यात यावी. जेणे करुन शासनाचा किती मोठ्याप्रमाणात जीएसटी कर बुडविला यांचे मोजमाप करणे सोपे जाईल व त्याबाबत जीएसटी विभागाला कळविता येईल.त्यामुळे जीएसटी अधिकारी हे दंडासह रक्कम वसुल करुन शासन उत्पनात भर पाडेल.
तरी अश्याप्रकारे अनाधिकृतपणे विनापरवाना वाहान विक्री करणा-यांनवर कायदेशिर कारवाई करुन वेळीच चाप लावावा.असे तक्रार अर्जात म्हटले आहे.तरीदेखील कोणतीही कारवाई न झाल्यास पुढील तक्रार जीएसटी कार्यालयाकडे करण्यात येऊन मुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन पोर्टलवर दाखल होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा