Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

शिरपूरात चौघे जुलवाणी बंधूवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल



शिरपूर प्रतिनिधी: येथील भरत देविदास करकाळ रा.सावीत्रीबाई फुलेनगर, वरवाडे,शिरपूर याने शिरपूर शहर पोलीसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या मित्राकडून शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी हरीलाल कन्हैयालाल जुलवाणी,गोपाल कन्हैयालाल जुलवाणी,कुणाल हरीलाल जुलवाणी,पियुष हरीलाल जुलवाणी सर्व खालचे गाव,बालाजी मंदिर,शिरपूर यांनी उधारीने पैसे घेतले होते.

यासंदर्भात पैसे देणाऱ्या मित्राची व वरील चौघांची बाचाबाची झाली. यात वरील चौघांनी भरतच्या सांगण्यावरून पैशाचा तगादा लावण्यात आल्याचा गैरसमज झाला. त्यांनी भरत याला मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली.या फिर्यादीवरून काल शिरपूर शहर पोलीस ठाण्यात वरील चारही संशयितांवर भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ व ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध