Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

बोराडी गावातील पेट्रोल पंप समोर बनावट दारू तालुका पोलिसांची कारवाई,बनावट दारू साठा जप्त..!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बोराडी गावातील एक इसम राजेश विश्वास पावरा रा. याने बोराडी गावातील पेट्रोल पंप समोर बेघर वस्तीत त्याचे घरात बनावट दारु बनविण्याचे साहित्य कब्जात बाळगुन लोकांचे आरोग्यास अपायकारक होईल अशी बनावट दारु चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी दि. 17/10/2022 रोजी रात्री 20.30 वाजेच्या सुमारास सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो.यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाली होती .


त्या अनुषंगाने एक पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पोलीस पथक नियुक्त केले.

बोराडी गावातील पेट्रोलपंप समोरुन पायी पायी बेघर वस्तीकडे जात असतांना एका बेघरातुन एक इसम जोरात पळतांना दिसल्याने त्यास पोलीस स्टॉफ ने थांब राजेश असा आवाज देवुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता परंतु तो गल्ली बोळातून अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. त्यानंतर तो ज्या घरातुन पळाला त्या बेघरात सोबत असलेल्या पंचांसमक्ष 22.30 वा.च्या सुमारास छापा टाकुन बेघराची झडती घेतली असता सदर बेघराच्या दरवाज्या लगत तसेच बेघराच्या किचन रुम मध्ये खालील वर्णनाचा व किंमतीचा बनावट टैंगो पंच देशी दारुचा साठा व बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आले . यात 1,34,400/- रुपये किंमतीच्या देशी दारु गोपंच असे लेबल असलेले 1920 काचेच्या सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180मि.ली. मापाच्या प्रती बाटली 70/- रुपये प्रमाणे.10,000/- रुपये किंमतीचे एक लोखंडी मशीन त्याचे वरच्या बाजुस हैंडल व त्याचे खाली बुध पॅक करण्याचे आटे व त्या खाली बाटली ठेवण्यासाठी स्टैंड, 7,000/-रुपये किमतीचे दोन प्लास्टिकचे स्पिरिट चे ड्रम,

 500/- रुपये किमतीचे प्लॉस्टीक कव्हर असलेले त्यात काचेचे अल्कोहोल मीटर 100/- रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे माप

50/- रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचे एक नरसाळे रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाची बारीक नळी पाच फुट प्रती फुट 10/- रु. प्रमाणे 50/-रुपये किमतीचे नरसाळे

20/- रुपये किंमतीचा कलरची प्लॉस्टीक जुनी वापरती बादली  असा एकुण 1,52,120/- रुपये किंमत असलेला मुद्देमाल जप्त करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री प्रविणकुमार पाटील सो,अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सो,प्रभारी मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर श्री दिनेश आहेर सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि / सुरेश शिरसाठ, पोसई/भिकाजी पाटील, पोहेकॉ /जाकिरोद्दीन शेख, पोहेकॉ/पवन गवळी, पोना / आरीफ पठाण, पोना/ संदिप ठाकरे, पोकों/ मनोज नेरकर, चापोकॉ/मनोज पाटील, पोकॉ/ संतोष पाटील यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याबाबत पोहेकॉ / जाकिरोद्दीन शेख यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं. 241/2022 भा.दं.वि. कलम 328, 468, 486, 488, 420 सह महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोसई/भिकाजी पाटील करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध