Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

अनाधिकृत टु व्हिलर विक्रेत्यांवर परिवहन विभागाचे आरटीओ कारवाई करतील का? अमळनेर व पारोळा येथील अनाधिकृत वाहन विक्रेत्यांना चाळीसगांव येथून वाहनांचा पुरवठा



शिरपूर प्रतिनिधी: परवानाधारक अधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांना शोरूम पासून दूर तेही ६० ते ८० किलोमीटर अंतरावर विक्रीसाठी परवाना आहे. काय? जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पारोळा येथील टू व्हीलर विक्रेत्यांना वाहने नेमके कोण पुरवते ? या ठिकाणी एकही अधिकृत विक्रेता नाही मग असे असताना त्यांच्या शोरूम भरगच्च अशी वाहनांनी भरलेली कसे काय? याचा शोध आमचा प्रतिनिधीने घेतला असता असे लक्षात आले की,अमळनेर, पारोळा येथे एकही अधिकृत टू व्हीलर शोरूम विक्रेता नसल्याने त्यांना होंडा,टीव्हीएस,बजाज, हे सर्व वाहने चाळीसगाव येथील अधिकृत परवाना असलेल्या टू व्हीलर विक्रेत्याकडून पुरवले जात असल्याची माहिती प्राप्त झाली.
 

असे असताना परिवहन विभागाचे अधिकारी यांना या शहरातील अनधिकृत विक्रेते दिसत नाही काय असा प्रश्न सर्वसामान्य वाहनधारकांना पडला आहे. 

जनतेचे तक्रारी अर्ज जाऊन देखील यांच्यावर पाहिजे तशी कारवाई होत नाही या मागचे नेमके गुड काय? जनतेचे तक्रारी अर्ज येतील तेव्हाच कारवाई करायची काय ? मग या विभागाचे अधिकाऱ्यांचे नेमके कर्तव्य काय? ते आपल्या कर्तव्याची कितपत साजेशी प्रामाणिकपणे कामकाज करतात असे कितीतरी प्रश्न जनतेच्या मनात उभे राहिले आहेत म्हणून आता तरी या परिवहन विभागाच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या अनधिकृत शोरूम धारकांवर कडक व कठोर कारवाई करून विक्रीसाठीची वाहने नेमकी कुठून आणली त्याचा सखोल चौकशी 
करून अशा अनाधिकृत शोरूम धारक विक्रेत्यांना वाहने पुरवणाऱ्या अधिकृत शोरूम धारकावर कठोर कारवाई करून त्यांना कायमचे ब्लॅकलिस्ट करावे जेणेकरून यानंतर त्यांना कोणत्याही कंपनीचे व कोणत्याही वाहनाचे अधिकृत परवाना देता येणार नाही अशी कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. आमच्या प्रतिनिधीने केवळ पारोळा शहरातच सहज म्हणून फेरफटका मारला असता शहरात गौरांग होंडा, सीएम टिव्हीएस, सुदर्शन ऑटोमोबाईल, बजाज, ओम ऑटोमोबाईल हिरो अशी टू व्हीलर विक्रेत्यांची शोरूम दिसून आले या शोरूम धारकांना वाहन विक्रीचा अधिकृत परवाना आहे काय ? त्याची मागणी जळगाव परिवहन विभागाकडे केलेली आहे. 
 
माहिती मिळताच त्यांच्यावर कारवाईसाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात येतीलच.

याच पध्दतीने धुळे जिल्हयात देखील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात अनाधिकृत टु व्हिलर विक्रेत्यांना धुळे येथील अधिकृत वाहन विक्रेत्यांकडून विक्रीसाठीची वाहने पुरविली जातात. शिरपूर येथे हिरो विमलनाथ ऑटो मोबाईल्स, श्रीदत्त कृपा होंडा, सुप्रभा मोटर बजाज, नरडाना येथील निर्मल मोटर्स, सोनगीर येथील सद्गुरु मोटार्स, हिरो, प्रगती होंडा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यांना विक्रीसाठी वाहन पुरविणारे धुळ्यातील परवाना धारक टु व्हिलर विक्रेत्यांवर कारवाई करुन ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी सर्व सामान्य जनता व सुज्ञ नागरीकानकडून होत आहे.

(वाचा सविस्तर पुढील अंकात )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध