Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ऐतिहासीक निर्णयामुळे शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही गटांना वापरता येणार नाही



राज्याच्या राजकारणामध्ये सत्ता संघर्षामुळे फार मोठे फेरबदल झालेले आपणास पाहावयास मिळाले आहेत शिवसेनेचे तब्यल 40 आमदार बंड करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी नवीन सरकार स्थापन केले आणि शिवसेना पक्षा समोर मोठ तगड आव्हान उभा केल शिवसेना ठाकरे यांची की शिंदे यांची हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला धनुष्यबाण ठाकरेंना मिळणार की शिंदे यांना यावर देखील मोठ्या प्रमाणात रसिखेच केली गेली हा संपूर्ण प्रकार न्यायप्रक्रियेमध्ये गेला सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये म्हटले की हा न्यायालयाचा भाग नसून हा निवडणूक विभागाचा विषय आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच यावर निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी धनुष्यबाण या चिन्हावर शिक्का मोर्तब होणार होता ठाकरेंना मिळणार की शिंदेंना व गोठणार यावर आज रोजी निर्णय होता ज्या पद्धतीने शिंदे गटाने आपले पुरावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केली त्याच पद्धतीने ठाकरे गटाच्या वकिलांना सांगण्यात आले की आपण तात्काळ लवकरात लवकर आपले जे काही म्हणणे असेल ते आमच्याकडे मांडण्यात यावे अशा नोटीसद्वारे सूचना देण्यात आल्या यानंतर ठाकरे गटाने आपले पुरावे व म्हणने मांडले यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले की येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसून तसेच नवीन चिन्ह घ्यावे लागणार आहे असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानावा लागेल तर पुढील सुनावणी दहा तारखेला होणार असून यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हेच बघणं महत्त्वाचं आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध