Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

आर.टी.ओ.च्या आशीर्वादाने अखेर अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा दसरा फेस्टिवल साजरा अनाधिकृत टू व्हीलर विक्रेतांना वाहने पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांवर कारवाईची मागणी..!



शिरपूर : शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील अनाधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांकडे असलेली वाहने हे नेमके कुठून व कोणाकडून येतात ? हा वाहन खरेदीदारांना असणारा प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिनिधीने के लेला अभ्यासातून कोणता अधिकृत टू व्हीलर विक्रेत्याने ती वाहने दिलेत आता याचा हिशोब घेणे अत्यंत सोपे आहे.


त्यांच्याकडे असलेल्या स्टॉक रजिस्टरमध्ये एकूण आणलेली वाहने व विक्री झालेली वाहने त्यात परिवहन विभागाकडे पासिंग म्हणजे रजिस्ट्रेशन साठी पाठवण्यात आलेली वाहने त्या सर्वाचा हिशोब घेतल्यास जी वाहने
शोरूम अथवा गोडाऊनमध्ये नाहीत आणि ते पासिंग देखील झालेले नाही म्हणजेच पासिंग करणे बाकी आहे . म्हणजेच अशी वाहने अजून विक्री झालेले नसून ते कोणत्यातरी अनाधिकृत विक्रे त्याकडे शिल्लक आहेत अशा पद्धतीने त्यांचा शोध घेऊन अनाधिकृत टू व्हीलर विक्रेते व त्यांना वाहन विक्रीसाठी पुरविणारे अधिकृत विक्रेते यांचा शोध लावता येईल.अश्या वाहन विक्रेत्यांना शोधून त्यावर जप्तीची कारवाई करता येईल.व त्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत शोरूम धारकाचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी वाहनधारकांमधून जोर धरू लागली आहे.

यात धुळ्यातील रॉयल बजाज शोरुम , ध्रुव होंडा , नवकार हिरो , अश्या
विक्रेत्यांकडून आज जिल्हाभरामध्ये अनाधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहने पुरविली जातात.त्यातच यामधुन शासनाचा मोठा कर बुडविला जात आहे म्हणून जी.एस.टी.( सेल टॅक्स ) विभागाने आज दसऱ्या निमित्त व त्यापुढे दिवाळी ऑफरच्या नावाने विक्रीसाठी आणलेली भरगच्च वाहने शोरुमसह गोडाऊन भरलेली आहेत तरी जी.एस.टी. विभागाने अश्या शोरुम धारकांकडे उपलब्ध असलेली वाहन व शासनास भरणा झालेला कर याचा ताळमेळ बघून कारवाई करावी.अशी वाहनधारक व सुज्ञ नागरिकांची मागणी आहे दसरा दिवाळी ऑफरच्या नावाखाली सर्वसामान्य वाहन खरेदीदार जनतेला लुटणाऱ्या लुटारू बरोबर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील आज दसरा साजरा होत आहे.

असे दिसून येते.सलग संपूर्ण आठवडा अनाधिकृत वाहन विक्रेत्यांबाबत बातमी प्रकाशित करून देखील कोणत्याही परिवहन अधिकाऱ्याने आजपावेतो अनाधिकृत वाहन विक्रेत्यांवर कठोर कारवाई केल्याचे दिसून येत नाही.त्यातच माननीय परिवहन आयुक्त व धुळे परिवहन कार्यालय यांच्याकडे केलेल्या तक्रारीवर किती दिवसात कारवाई होते व ती कोणता अधिकारी कारवाई करतो . याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

( वाचा सविस्तर पुढील अंकात )


1 टिप्पणी:

प्रसिद्ध