Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
कशी नशिबाने थट्टा मांडली...वय वर्षे 21,दोघं किडनी निकामी-बोरगांव येथील सागर वारुडे च्या मदतीला गावकरी आले धावून
कशी नशिबाने थट्टा मांडली...वय वर्षे 21,दोघं किडनी निकामी-बोरगांव येथील सागर वारुडे च्या मदतीला गावकरी आले धावून
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगांव येथील 21वर्षीय तरुणाच्या दोघं कीडन्या निकामी झाल्या आहेत. ज्या वयात युवक तारुण्यांच्या धुंदीत विविध स्वप्न पाहत आपल्या वेगळ्याच विश्वात रमत असतो त्या वयात सागर च्या नशिबी दोघं किडनी निकामी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याला इंदिरा हॉस्पिटल शिरपूर येथे डायलिसीस चालु आहे.
वडील आधीच व्याधीने ग्रस्त, आपल्या जवळील असलेल्या 2-3 शेळ्या चारून कसाबसा उदरनिर्वाह करता. आई मजुरी करते, घरात आजी मागील 10 वर्षापासून अंथरुणात आहे तर स्वतः सागर हा सुरत येथे आपल्या काकाजवळ दुसऱ्याच्या सलून दुकानात काम करीत होता.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कुटुंब प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवनाचा गाडा हाकत असतांना त्यांच्या मुलाच्या नशिबी असे गंभीर आजारपण आल्याने आई-वडील आर्थिक विवंचनेत सापडले. ग्रामस्थांना वारुडे कुटूंबाची आर्थिक परिस्थितीची जाण असल्याने आपापल्या परिस्थितीनुसार गावकऱ्यांनी रोख स्वरूपात मदत द्यायला सुरुवात केली. जे ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाले आहेत ते फोनपे द्वारे मदत करीत आहेत. कल्याण स्थित श्री संजय धोंडू बोरगांवकर यांनी दहा हजार रुपये फोनपेद्वारे पाठविले. गावातील माजी सैनिक श्री दगेसिंग राजपूत, सरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी अनुक्रमे 5100रु व 2200रु रोख स्वरुपात मदत केली.
शिरपूर ला गोयल ट्रेडिंग या दुकानात कामाला जाणारा गावातील तरुण श्री विठोबा जयसिंग राजपूत या युवकाने आपल्या मालकांकडून रु 5100 ची रोख मदत मिळवून दिली.
साधारपणे मुलाच्या या वयात आई-वडील त्याच्या साठी वेगळे स्वप्न पाहत असता तसेच त्याच्या कडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असता, या तरुणाने त्या पूर्ण केल्या ही असत्या पण दुर्दैवाने त्याच्या नशिबी दोघं किडनी निकामी असल्याचे दुखणं आले. पण असे असतांनाही हा तरुण आपल्या दुखण्याला निर्भयपणे सामोरे जात आहे.
विविध समाज माध्यमातून बोरगांवकर ग्रामस्थांनी नम्र आवाहन केले आहे की चि सागर ज्ञानेश्वर वारुडे या तरुणांस सढळ हाताने मदत करावी व एका गरीब तरुणांस नवसंजीवनी देण्यास यथाशक्ती हातभार लावावा.
(फोनपे नं 9558802551 किरण ज्ञानेश्वर वारुडे)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा