Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

राष्ट्रीय महामार्ग क्र.752-G सटाणा पिंपळनेर या रखडलेल्या कामासंदर्भात समस्त पिंपळनेर शहरवासियांनी प्रशासनाला अगोदरच दिलेल्या निवेदनाप्रमाणे अभुतपुर्व अशा पद्धतीने एकत्रित येत आज बेमुदत महामार्ग बंद आंदोलन



सकाळी 10 वाजेपासुन बस स्टॅन्ड चौक व सामोडे चौफुली अशा 2 ठिकाणी सुरु करण्यात आले होते. तब्बल 3 तास चाललेल्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत मा.जिल्हाधिकारी व प्रांतधिकारी, धुळे यांचे प्रतिनिधी म्हणुन साक्रीचे तहसीलदार तथा पिंपळनेरचे प्रभारी अप्पर तहसीलदार श्री.प्रवीण चव्हाणके साहेब व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपकार्यकारी अभियंता, नाशिक श्री.वानखेडे साहेब यांच्या वतीने पुढील 2 दिवसात योग्य ती प्रक्रिया पार पाडत काम सुरु करण्यात येईल अशा लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात आज पिंपळनेर शहरातील सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर्ससह सर्वसामान्य पिंपळनेरकर हे मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले होते. तीन तास रणरणत्या उन्हात बसलेल्या पिंपळनेरकरांच्या एकीने झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला आज यामुळे जाग आलेली दिसुन आली. अतिशय सनदशीर व शांततेच्या मार्गाने चाललेल्या या आंदोलनात भजणी मंडळानी देखील सहभाग नोंदवला होता. प्रशासनाने आपल्याला या संदर्भात 2 दिवस मागितलेले असुन या आंदोलनानंतरही काम सुरु करण्यात आले नाही तर येत्या 15 डिसेंबर पासुन याच महामार्गवर पिंपळनेरकर नागरीक आमरण उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनासाठी आज सकाळपासुन सर्व वर्तमानपत्र व tv वाहिन्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहा.पो. निरीक्षक व त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. उन्हात बसलेल्या नागरीकांना अधुनमधुन काही नागऱीक स्वयंस्फूर्तीने चहा पाणी बिस्कीट्स आणून देत होते तसेच व्हिडीओग्राफर देखील उपस्थित राहून कुठलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चित्रीकरण करतांना दिसुन आले. यासाठी आपल्या सर्वांचे आपल्याच सर्वांतर्फे खुप खुप आभार व अशीच एकी दाखवत हे आंदोलन गरजेप्रमाणे पुढे घेऊन जाऊया, ही नम्र विनंती..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध