Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२
एस.एस व्ही पी.एस.महाविद्यालय शिंदखेडा येथे वैद्यकीय तपासणी शिबिर
शिंदखेडा प्रतिनिधी:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै.शं.दे.पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य व वाणिज्य आणि कै. भाऊसाहेब म.दि.सिसोदे विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिर दिनांक 24 /11 /2022 रोजी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले.त्यात आमच्या महाविद्यालयातील प्रथम वर्ष साहित्य, वाणिज्य आणि विज्ञान तसेच एम एस सी चे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या शिबिरात मुली 247 आणि मुले 143 यांची वैदयकीय तपासणी करण्यात आली.आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयातील साहित्य व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ.विशाल पवार यांनी उद्घाटन केले याप्रसंगी डॉ.योगेश वाधवा आणि सौ. डॉ.पल्लवी पाटील यांचे स्वागत उपप्राचार्य प्रा.डॉ.विशाल पवार आणि सौ प्रा. डॉ.आशा कांबळे यांनी केले. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.यू.पी.खैरनार आणि प्रा.आर के पवार ,प्रा.डॉ.एस बी सावंत माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.एस के जाधव आदी उपस्थित होते.
या शिबीरात महाविद्यालयात प्रथम वर्षास प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थीनींची वैदयकीय तपासणी डॉ. योगेश वाधवा आणि सौ. डॉ. पल्लवी पाटील यांनी केली. तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनींना असलेल्या शारिरीक अडचणींची त्यांनी चौकशी केली आणि त्यावर उपाययोजना सांगितल्या. या शिबीराचा विद्यार्थी-विद्यार्थीनींना निश्चितच फायदा झाला.वैदयकीय शिबीराच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रफुल्लकुमार सिसोदे,उपाध्यक्ष श्री.अशोक पाटील, प्र.प्राचार्य डॉ.तुषार पाटील,विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस व्ही. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. सुधाकर बोरसे व श्री.संभाजी पवार यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा