Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यातील 7771 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर शिरपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायतची निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील 7771 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर शिरपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायतची निवडणूक कार्यक्रम जाहीर
शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले असून यानुसार राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या टप्प्यात शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत च्या निवडणुका संपन्न होणार असून यात अजंदे बुद्रुक, अजनाड,अर्थे बुद्रुक,अर्थे खुर्द,
बोराडी,हाडाखेड,हिसाळे,करवंद,
खंबाळे,खर्दे बुद्रुक,महादेव दोंडवाडा,मांजरोद,त्तहाड कसबे,
थाळनेर,तोंदे,वरझडी,वाघाडी
इत्यादी ग्रामपंचायत यांच्या समावेश आहे.
या सर्व निवडणूक प्रक्रियेत थेट जनतेतून सरपंच पदांचे देखील निवड होणार आहे.
आणि राज्यात 34 जिल्ह्यात 340 तालुक्यांमधील 7751 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.या निवडणुकीसाठी नामनिर्देशनची प्रक्रिया संगणक प्रणाली द्वारे राबविण्यात येणार आहे.
यात जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमा अनुसार तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्धी करण्याच्या दिनांक 18 नोव्हेंबर 2022 असा असून नामनिर्देशन पत्र मागवण्याच्या व सादर करण्याच्या दिनांक 28 नोव्हेंबर ते २ डिसेंबर 2022 असा आहे. नामनिर्देशन पत्र छाननी करण्याची दिनांक ५ डिसेंबर असा असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या दिनांक 7 डिसेंबर 2022 निर्धारित केला आहे.
उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह हे दिनांक ७ डिसेंबर 2022 रोजी दुपारी ३ वाजेनंतर प्रसिद्ध करण्यात येईल व मतदानाच्या दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी ७.३०ते ५.५० वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. मतमोजणी व निकाल घोषित करण्याच्या दिनांक 20 डिसेंबर 2022 असून 23 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे धामधुम सुरू झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा