Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील आर.टी.ओ.चेकपोस्टची महालूट थांबविणे कुणालाही शक्य नाही!!



तरुण गर्जना: धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यातील आर.टी.ओ.चेकपोस्ट वरील दररोजची लाखोंमधील लुटमार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खान्देशातील एक फायर ब्रॅन्ड नेते राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमाहून परत येताना म.प्र.हद्दीवरील चेकपोस्टवर स्टींग ऑपरेशन केले.त्यांनी या चेकपोस्ट मध्ये प्रवेश केला.तेव्हा एक खाजगी पंटर घाईने लाखोंच्या नोटांचा ढिगारा पुढून मागून सर्व खिशात व शर्ट मध्ये कोंबून बाहेर पळत सुटला.त्यावेळी विविध ट्रक ड्रायव्हरांनी त्यांच्या जवळ व्यथा मांडली.सर्व कागदपत्रे ओ के असली तरी हजार रुपये बिन पावतीची एन्ट्री द्यावीच लागते.दोनशे रुपयां पासून आठ हजार रुपयांपर्यंत वसूली होते.ओव्हरलोड ट्रकची खाजगी वसूली पंचवीस - तीस हजार रुपयांपर्यंत होते. 


येथील वजन काटे हे मुद्दामहून सेटिंग केले जातात.असलेल्या वजनापेक्षा दोन तीन टन अधिक वजन दाखविले जाते. विविध ड्रायव्हरच्या व्यथा त्यांनी रेकॉर्ड केल्या.या आधीही नाथाभाउंनी आरटीओ चेकपोस्ट च्या काळ्या धंघाच्या कहाण्या उजागर केल्या होत्या. परंतू तेथे काही तासातच पुन्हा जैसे थे लूटमार सुरु होते.

मध्यंतरी चाळीसगाव च्या आमदारांनी देखील आरटीओ कडून ट्रक वाल्यांच्या हप्त्यांचे स्टींग ऑपरेशन केले होते.जर आमदार म्हणून नाथाभाउ व चाळीसगावचे आमदार जागेवर पोहोचून भांडाफोड करू शकतात,तर इतर आमदार कां करू शकत नाहित ? या शिवाय शहरात लहान - लहान प्रकरणात तोड्या करणारे तोडेपीर आर.टी.ओ.चेकपोस्ट च्या महाखुल्या - महामोठ्या लूटी बाबत गप्प कां असतात.शांत कां बसतात? सर्वत्र किरकोळ - किरकोळ प्रकरणात आंदोलन करणारे, अमूक - ढमूक स्टाईलने आंदोलनाच्या उठसूट घोषणा करणारे शुरवीर चेकपोस्ट बाबत गप्प कां असतात ? तिनही जिल्ह्यात जनतेच्या प्रश्नांवर लढण्याचा दावा करणारे अनेक राजकीय पक्ष व अनेक खंडीभर संघटना आहेत.अनेक मीडिया कर्मी आहेत.अनेक पदे मिरविणारे  पदाधिकारी आहेत.जनतेला वारंवार आवाहन करणारे अॅन्टी करप्शन वाले आहेत.कर्तव्य दक्षतेचा दावा करणारे बडे शासकीय अधिकारी आहेत.  

यातील एकालाही आरटीओ चेकपोस्ट वरील ही महालूट - खुली लूट माहित नाही काय? त्यांना दिसत नसेल काय?  दिसते जरूर दिसते ! पण सारे चिडीचूप राहतात.त्याचे रहस्य काय ? त्याचे रहस्य लपले आहे आरटीओ खात्यात मेंटेन केल्या जाणार्‍या ' भिकारी डायरीत ' शिवाय दरमहाच्या पगाराप्रमाणे वाटल्या जाणाऱ्या पाकिटांच्या थप्पीत! अशा भिकारी डायरीचे व पाकिटांच्या थप्प्यांचे चलन ज्या दिवशी बंद होईल त्यादिवशी चेकपोस्टवर धावा बोलणार्‍यांची गर्दी वाढेल.चेकपोस्ट वरील कोट्यवधींचा प्रवाह थेट मुंबईपर्यंत वर - वर पर्यंतही वाहात असतो. त्यामुळे कितीही ओरड झाली तरी काहीच फरक पडत नाही. कारण चेकपोस्ट वर ड्यूटी मिळविण्यासाठी वरूनच बोली लावून तो अधिकारी आलेला असतो. मंत्रालयच भ्रष्ट्र असेल तर कारवाई कोण करणार ? नवापूरचे गव्हाली , शिरपूरचे हाडाखेड चेकपोस्ट तर राज्यात सर्वात हेवी चेकपोस्ट पैकी एक मानले जाते.इथे अक्षरश: शेतकरी ज्याप्रमाणे पोत्यात दाबून - दाबून कपाशी भरतो त्याप्रमाणे गोण्यांमध्ये दाबून - दाबून ट्रकवाल्यांच्या नोटा भरल्या जातात. नाथाभाउ म्हणतात, ' त्यांनी चेकपोस्ट मध्ये शिरताच तेथील नोटा पुढे - मागे सर्व खिशात कोंबून खाजगी पंटर पळत सुटला.'शिरपूरच्या पळासनेर चेक पोस्टचा काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे.

तेथे रेड झाली, तेव्हा तेथील तीन पंटर नेटांनी ठेसाठेस  भरलेल्या गोण्या घेवून शेता शेतातून ढांगे - ढांग पळत सुटले होते. तेव्हा या गोण्यांमधून सांडलेल्या नोटा घ्यायला परिसरातून लोकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.पैशांचा पाउस पाडणाऱ्या मांत्रिकांनी फसविले अशा बातम्या आपण नेहमी वाचतो.चेक पोस्ट वर तर आरटीओ अधिकारीच मांत्रिक असतात. कोणताही मंत्र न म्हणता अधिकाराच्या जोरावर ते रोजच चेकपटेस्ट मध्ये पैशांचा पाउस पाडत असतात.त्यातले किरकोळ तुकडे ते ' भिकारी डायरी ' च्या माध्यमातून फेकत राहतात.त्यातून आपले धंदे निर्वेधपणे पार पाडत असतात.आमदार नाथा भाउंनी येथे स्टींग ऑपरेशन केले.चांगली बाब आहे. 

ही मोहिम त्यांनी कंटिन्यू ठेवावी.त्यात सातत्य ठेवावे. कारण या प्रकारे काही कारवाई झाली तर चेकपोस्ट वरील लुटमार तेवढ्या पुरती काही तासांसाठीच थांबते व पुन्हा जैसे थे सुरु होवून जाते.चेकपोस्टवर खाजगी कमाई प्रचंड म्हणजे महा प्रचंड असते. सरकारी कमाई मात्र चेकपोस्टचा खर्चही भरून निघेल की नाही इतकी कमी असते.त्यामुळे गुजरात मध्ये अनेक महिन्यांपूर्वी सर्व चेकपोस्ट बंद करण्यात आले.महाराष्ट्र सरकार - परिवहन विभाग इतके चटावलेले आहेत की त्यांना ही खाजगी दुभती गाय असणारे चेकपोस्ट सोडवत नाही. त्यामुळे ऑन लाईनच्या या जमान्यातही,मानवी हस्तक्षेपाची - भ्रष्टाचाराची ही महालूट केंद्रे सुरुच ठेवण्यात आली आहेत!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध