Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

चोपडा शहर पोलिसांची कारवाई ! पाचशेच्या बनावट नोटा बाळगणारे चौघे अटकेत ;



चोपडा (प्रतिनिधी) पाचशेच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी, चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून गुरुवारी सायंकाळी चार जणांना अटक केली.

शहरातील हॉटेल सुयोगजवळ गुरुवारी सांयकाळी विजय सुरेश निकुंभ (वय २६,रा.खर्दे,ता.शिरपूर),किरण रमेश शिंदे (वय ३३,रा.सांगवी,ता.शिरपूर), शंकर पुनमचंद वडर (रा.वाडी, ता. शिरपूर) आणि संतोष वडर (रा. शिंदखेडा) यांना ताब्यात घेतले.या चौघा संशयितांकडे पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळल्या.नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही, त्या खऱ्या असल्याचे भासवून व्यवहारात वितरीत करताना,चौघांना पोलिसांनी पकडले.हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील विजय निकुंभे व किरण शिंदे यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले.तर शंकर वडर व संतोष वडर यांना शिरपूर येथून ताब्यात घेण्यात यांना यश आले आहे. संशयितांकडून दुचाकी,मोबाईल असा ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध