Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

नंदुरबार जिल्ह्यात घरकुल अनुदान घोटाळा* *दिशा समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेशः खा.डॉ.हीना गावित



तक्रारी नसलेल्या ठिकाणीही चौकशी करणार,अनेेक
अधिकाऱ्यांचा सहभागाची शक्यता आहे.महाविकास आघाडीकडून दुर्लक्ष
खा.डॉ.हीना गावित
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  अनेक लाभार्थ्यांना अंधारात ठेवून 
 त्यांच्या नावावर दुसर्‍याच व्यक्तींकडून घरकुलाचे अनुदान हडप करण्याचे  प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची चौकशी  तर होणारच आहे. मात्र, ज्या ठिकाणी तक्रारी नसतील अशा सर्व घरकुलांची चौकशी करण्याच्या सूचना दिशा समितीच्या बैठकीत संबंधीत अधिकार्‍यांना दिल्या आहेत. हा घोटाळा एक दोन व्यक्तींचा नसून यात अनेक जणांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या घोटाळयात नेमकी चुक कोणाची आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा खा.डॉ.हीना गावित यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध