Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील सावळदे व गिधाडे सुसाईड पॉईंट म्हणून ओळख प्रशासनाच्या निदर्शनास येऊन देखील या ठिकाणी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आजपर्यंत प्रशासन अपयशी...!
शिरपूर तालुक्यातील सावळदे व गिधाडे सुसाईड पॉईंट म्हणून ओळख प्रशासनाच्या निदर्शनास येऊन देखील या ठिकाणी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आजपर्यंत प्रशासन अपयशी...!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यातील सुसाईड पॉईंट म्हणून ओळखले जाणारे गिधाडे व सावळदे तापी पूलांवर नेहमीच आत्महत्येच्या घटना समोर येत असतात.याबाबत वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास येऊन देखील या ठिकाणी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आजपर्यंत प्रशासन अपयशी ठरले आहे.
काल दिनांक 21 रोजी शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदी पुलावर मोटरसायकलने आलेल्या युवकांनी मोटरसायकल पुलावर लावून नदीपात्रात उडी घेतली असे काही प्रत्यक्ष दर्शनी पाहिले.याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.त्यास बचावासाठी प्रयत्न केले गेले मात्र दुर्दैवाने यात तरुणाच्या बुडून मृत्यू झाला.यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार सदरच्या 24 वर्षे तरुण हा सुरेंद्र सरदार सिंग राजपूत असून तो तालुक्यातील टेंबे बुद्रुक येथील रहिवासी आहे.
हा तरुण कृषी क्षेत्रात मार्केटिंगचे काम करत होता मात्र काल अचानक त्याने अशा प्रकारच्या दुर्दैवी निर्णय घेतल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे.रात्री उशिरापर्यंत पाण्यात मृतदेहाच्या शोध घेणे सुरू होते आज दिनांक 22 रोजी सकाळी शोध सुरू असताना या युवकाच्या मृतदेह आढळून आला आहे. सदरची दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला.या तरुणांनी हा निर्णय का घेतला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून याबाबत तपास सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा