Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात सन्मान विधवा भगिनींचा कार्यक्रम संपन्न...!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 16 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान विधवा भगिनींचा हा कार्यक्रम संपन्न झाला.


कोल्हापूर जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वप्रथम विधवा महिलांच्या अस्मिते करता ग्रामसभेत ठराव करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर 20 मे 2022 रोजी मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या सन्मानाच्या शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयाच्या सन्मानात शिरपूर पंचायत समिती येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी मॅडम यांच्या शुभहस्ते कार्यालयातील विधवा महिलांच्या सन्मान करत साडीवाटप व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश गिरासे ,महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे ,गटशिक्षण अधिकारी एफ के गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा पावरा सर्व अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिलांना धीराने आयुष्यास तोंड द्या ,प्रशासन तुमच्या सोबत आहे आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा जुगारून जीवनात सामोरे जा असे मार्गदर्शन केले.

 यावेळी गटविकास अधिकारी सोनवणे यांनी देखील कार्यक्रमात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे व गटविकास अधिकारी गायकवाड यांनी व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन विस्ताराधिकारी नीता सोनवणे यांनी केले. यावेळी सत्कार व सन्मान देण्यात आलेल्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद भाव दिसून आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध