Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

नानक साई फाऊंडेशन चा पुढाकार, संत नामदेव घुमान यात्रेतून राष्ट्रीय एकात्मता चा संदेश,पंजाब सह उत्तर भारतातील विविध स्थळांना भेटी देऊन यात्रा नांदेडला परतली : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ बोकारे यांचे कुशल नियोजन...! 248 भक्तांनी घेतला सहभाग...!



नांदेड प्रतिनिधी नांदेड (17 नोव्हेंबर 2022) संत नामदेव महाराज यांच्या 752 व्या  जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेली घुमान यात्रा काल रोजी गंगानगर एक्सप्रेस ने नांदेड येथे पोहचली. हुजूर साहिब रेल्वे स्टेशनवर नांदेडकरांनी यात्रेकरूंचे पुष्पवृष्टी ने भव्य दिव्य असे स्वागत केले. पंजाब सह उत्तर भारतातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देत बंधूप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता चा संदेश देण्यात आला. 

भक्तीची एक नितळ वाट माणसाच्या मनात धोपटं करून भक्तीरसात अक्षरशः भिजवते असा प्रत्यक्ष अनुभव घेत. धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेलं समाधानाच धन घुमान यात्रेच्या माध्यमातून यात्रेकरूंनी अनुभवलं..महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून भक्तांनी सहभाग नोंदवला.. आठवी घुमान याञा शनिवारी रात्री नांदेड येथे दाखल झाली आहे.नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या कुशल  मार्गदर्शन आणि उत्कृष्ट नियोजनात हि यात्रा आयोजित केली जाते.. या वेळी, संत नामदेव महाराजांच्या  752 वि जन्म -शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्या कारणाने घुमानवारीला वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते.  

लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जथेदार नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी,संत बाबा गुरुदेवसिंघ जी शहिदीबाग आनंदपूर साहिब,निलधारी संप्रदाय चे प्रमुख संत बाबा सतनामसिंघ जी पिपली साहिबवाले,संत बाबा जोगासिंघ करणालवाले यांचा घुमान यात्रेला कृपा आशीर्वाद लाभलेला आहे. 

पंजाब मुख्यमंत्री भगवन्त मांन यांच्या वतीने त्त्यांच्या मातोश्री हरपालकौर मान,शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, दिल्ली शीख गुरुद्वारा कमिटी, निलधारी संप्रदाय, सरबत दा भला ट्रस्ट, घुमान नामदेव दरबार कमिटी, नैना देवी मंदिर न्यास द्वारा यात्रेचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. 

संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी  'तीर्थक्षेत्र घुमान' - 'सुवर्ण मंदिर' अमृतसर - शक्ती पीठ 'माता नैना देवी',शक्ती पीठ माता ज्वाला जी (हिमाचल प्रदेश) - 'आनंदपूर साहिब' (तख्त) - आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य 'भाकरा नांगल' धरण - पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले 'विरास्ते 'खालसा मुजियम' आनंदपूर साहिब  - गोविंदवाल साहिब,- परजिया कलान' - वाघा 'अटारी' बॉर्डर - 'जालियनवाला' बाग - फतेहगड साहिब, कुरुक्षेत्र, पानिपत, दिल्ली असे भ्रमण व दर्शन आणि भाईचारा,राष्ट्रीय एकात्मताचा संदेश देत यात्रा नांदेड येथे दाखल झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध