Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे हे काय लाचखोरीला आळा बसविण्याची जबाबदारी असलेल्याच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातच अॅन्टी करप्शन मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.
अरे बापरे हे काय लाचखोरीला आळा बसविण्याची जबाबदारी असलेल्याच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातच अॅन्टी करप्शन मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.
नांदेड प्रतिनिधी : लाचखोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात पोलिस दलात स्वतंत्र विभाग आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग म्हणून तो ओळखला जातो.मात्र,लाचखोरीला आळा बसविण्याची जबाबदारी असलेल्याच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातच (अॅन्टी करप्शन) भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.प्राप्त तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी 2 मध्यस्थीमार्फत लाचेची मागणी करणार्या महिला पोलिस निरीक्षकास अॅन्टी करप्शनच्या पथकानं पकडलं आहे.या प्रकरणामुळं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक मीना बकाल असे लाचेखोर महिला पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.दरम्यान,त्यांना आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.लातूर जिल्हयातील अहमदपूरमधील खाजा मगदूम शेख यांचे बंधू शेख मेहराज हे कंधारच्या तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय करतात.दरम्यान,शेख यांना अॅन्टी करप्शनच्या कार्यालयातून चौकशीसाठी बोलावण्यात आलं.त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं थोडंसं घाबरल्यासारखं झालं.दरम्यान शेख यांच्याकडे 2 मध्यस्थांमार्फत त्यांच्याविरूध्द प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करून नये म्हणून 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली.लाचेची मागणी होत असल्यानं शेख यांनी औरंगाबादच्या अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली.
ज्या मध्यस्थांमार्फत लाचेची मागणी होत होती त्यांना दि. 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अॅन्टी करप्शनच्या पथकानं पोलिस निरीक्षक मीरा बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर यांना अटक केली.
दरम्यान,बकाल आणि त्यांच्या पतीसह इतर दोघांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक मीरा बकाल या गेल्या वर्षभरापासून नांदेड येथील अॅन्टी करप्शन विभागात कार्यरत होत्या.
सन 2012 मध्ये बकाल या पोलिस दलात सेवत आल्या आहेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा