Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

मालेगाव हद्दीतील म्हाळदे शिवारात १५ गोवंशाची सुटका…….नाशिक ग्रामीण पवारवाडी पोलीसांची अवैध व्यावसायांविरोधी कारवाई !



नाशिक (वा.) ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आदेशीत केल्याप्रमाणे,जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत.

पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत काही संशयीतांनी म्हाळदे शिवारात गोवंश जनावरांची कत्तल करण्याचे इराद्याने एकुण १५ जनावरांना निर्दयतेने जखडून बांधून ठेवले असल्याबाबत पवारवाडी पोलीसांना माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलीस पथकाने म्हाळदे शिवारात छापा टाकून सदर ठिकाणाहून १५ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. 

सदर छापा कारवाईत संशयीत मन्नान पुर्ण नाव माहित नाही,रा.मालेगाव,व आसीफ वायरमन पुर्ण नाव माहिती नाही,रा.मालेगाव असे दोघेजण पोलीसांची चाहूल लागताच पळून गेले आहे.सदर इसम हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी,गोवंश हत्याबंदी असतांना,विनापरवाना बेकायदेशीर
रित्या१५ गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे इराद्याने निर्दयतेने जखडून बांधून ठेऊन स्वतःच्या कब्जात बाळगतांना मिळुन आले म्हणुन त्यांचेविरूध्द पवारवाडी पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं.२२६ / २०२२ महराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ) चे उल्लंघन ९ प्रमाणे तसेच प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम कलम १९६० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोनि सुधीर पाटील यांचे पथक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध