Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने चला जाणू या नदीला या अभियानात गोदावरी नदीला वगळल्याने -- तीव्र संताप.रामकुंडावर आत्मक्लेश .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने चला जाणू या नदीला या अभियानात गोदावरी नदीला वगळल्याने -- तीव्र संताप.रामकुंडावर आत्मक्लेश .
नाशिक प्रतिनिधी:स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण 75 नद्या उपनद्या यांचे जल अमृत व्हावं यासाठी नदियात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.व चला जाणूया नदीला या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु पवित्र अशा व दर बारा वर्षांनी कुंभमेळा होणाऱ्या गोदावरी (गंगेचा)नदीचा समावेश या नदी यात्रेच्या यादीमध्ये केलेला नाही, याबाबत सातत्याने प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही या शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश त्यांच्या जीआर मध्ये सरकारी अध्यादेशामध्ये केलेला नाही.हा मोठा अन्याय आहे.
त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून यासाठी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व साधूमहंत,पुरोहित संघ,सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरण प्रेमी यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत गोदावरी नदी गंगा घाटावरील रामकुंडावर आत्मक्लेश करण्यात आले.
यासाठी नाशिक मधील साधू, महंत, पुरोहित संघ, नाशिककर व सर्व पर्यावरण प्रेमी यांनी पवित्र अशा रामकुंड या ठिकाणी आत्मक्लेष करण्यात आले. यात महंत भक्तीचरदास महाराज,
महंत राजाराम महाराज,पुरोहित संघाचे अध्यक्ष मा सतीशजी शुक्ला,निशिकांत पगारे,काँ.राजू देसले,एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार,राजू शिरसाठ, नंदिनी नदीचे प्रा.सोमनाथ मुठाळ, वरूना नदीचे सुनील परदेशी,राहुल जोरे ,वीरेंद्र टिळे, रोहित कानडे,आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे पत्रकार सुरेश भोर, डॉ अजय कापडणीस, योगेश कापसे , जगबिर सिंग, सुरेंद्र बोरसे,वैशालीताई चव्हाण,भारतीताई जाधव व मंगलाताई पिसे,आधी प्रतिनिधी उपस्थित होते.याप्रसंगी पंचवटी पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा