Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

कायद्यांचे उल्लघंन करणा-या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालकांनवर अपात्रतेची कार्यवाही




शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील कोळवद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तीन संचालकांवर दुसऱ्या संस्थेची चौकशीतील जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याने या तिघ संचालकांना यावल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल जे.बी.बारी यांनी अपात्र घोषित केल्याने सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.यावल तालुक्यातील कोळवद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या मार्च २०२२ च्या साधारण ९ महीन्यापुर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिल प्रल्हाद पाटील, शशिकांत नारायण चौधरी, हे सर्वसाधारण मतदारसंघातून तर अनिल रामचंद्र महाजन हे इतर मागास मतदारसंघातून निवडून आलेले होते,  हे तिघेजण धनलक्ष्मी फळ भाजीपाला विक्री सहकारी सोसायटी लिमिटेड कोळवद तालुका यावल या संस्थेच्या संचालक मंडळावर कार्यरत होते या ठिकाणी पदमाकर बळीराम महाजन, प्रल्हाद डालू चौधरी, केवलदास नथू चौधरी यांनी वरील तिघांविरुद्ध चौकशी मध्ये जबाबदारी निश्चित मध्ये नाव आल्याने तिघांचे संचालकपद रद्द करण्यात यावे अशी तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडे केली होती त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७३ क अ तीन अन्वये अधिकाराचा वापर करून तिघे संचालक यांनी अपात्रता धारण केली असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ प्रमाणे त्यांना व्यवस्थापकीय समिती वरून निष प्रभावित करण्यात आल्याचा निर्वाळा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल जे. बी. बारी यांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दिल्याने यावल तालुक्यात सहकार क्षेत्रात एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत हे अपात्र संचालक न्याय मिळेल त्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्याकडे आपण दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.

अश्याच प्रकारे आमच्या तरुण गर्जना वृत्तपत्रातून शिरपूर तालुक्याती तोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे विषयी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.यात शासनाने संस्थेच्या रेशन दुकानास दिलेले आनुदान बॅक अधिकारी यांच्या मदतीने सचिव व चेअरमन यांनी परस्पर लाटल्याबाबतची तक्रार संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक राहुल चौधरी व संस्थेचे जवळपास 30 सभासदांच्या सहीनिशी सहाय्यक निबंधक,शिरपूर यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली असल्याने त्याबाबत चौकशीचे आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर यांनी निर्गमीत केल्याचे वृत्त मिळाले.या चौकशीत ते दोषी असल्याचे आढळल्यास याच प्रमाणे त्याच्यावर देखील अपात्रतेची कार्यवाही तक्रारदार यांनी मागणी केल्यास होऊ शकते.मात्र यासाठी चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यत तक्रारदार यांना वाट पाहावी लागेल. हे निश्चित.

तर आंबेगाव तालुक्यातील पेठ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची सण 2022-2027 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीत निवडून आलेले तीन संचालक दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने अपात्र ठरविण्यात आले आहेत. याट चेअरमन ज्ञानेश्वर भगवंत वाकचौरे,व्हा चेयरमन रामदास बबन उठाणे,बाळासाहेब श्रीपती बोऱ्हाडे,यांना दोन पेक्षा जास्त अपत्ये असतानाही त्यांनी ती माहिती लपवून निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती.याबाबत दि. 22/3/2022 रोजी दिलीप म्हातारबा पवळे, संभाजी शिवाजी काळे, अशोक भागुजी धुमाळ, कांताबाई मनोहर कंधारे यांनी सर्व कागदपत्रे पुराव्यासह सहाय्यक निबंधक कार्यालय मंचर येथे तक्रार अर्ज दिला होता.तसेच सदर संचालकाचे पद रद्द व्हावे यासाठी जिल्हा उपनिबंधक ग्रामीण कार्यालय,सह निबंधक कार्यालय पुणे,आयुक्त सहनिबंधक कार्यालय पुणे,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.याबाबत सदर संचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन चालढकल करत असल्याचे लक्षात येतात याबाबत अर्जदारांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालय मंचर यांनी अर्जदार, संस्थेचे संचालक यांना बोलावून सर्व कागदपत्रे व पुराव्याची तपासणी करुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 नुसार या तीन संचालकाचे पद रद्द करून ते अपात्र झाले असल्याचे आदेश दि. 12/8/2022 रोजी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध