Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पीआर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली मोठी कारवाई...!



नंदुरबार (प्रतिनिधी)-पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमाणेच शहर पोलीस ठाण्याची धुरा सांभाळल्यानंतर कामगिरीच्या धडाका अखंड सुरूच ठेवला आहे.चोरीस गेलेल्या 8 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या व साडेचार लाखाच्या ट्रॅक्टर असा 9 लाख 30 हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून, चोरट्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अरुण सुकलाल वळवी (27)रा. खामगाव ता.जि नंदुरबार असे चोरट्याचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचला असता संशयित आरोपी हा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह येत असतांना दिसून आला. पोलीस पथकाने त्यास थांबवण्याच्या इशारा केला असता संशयित आरोपी हा चालता ट्रॅक्टर मधून पळून जाण्यात प्रयत्न करू लागला.त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले.

आरोपी अरुण वळवी याने सात ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या चोरीची कबुली दिली आहे.ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पीआर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध