Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आठ कोटी रुपयांच्या नकली नोटा विक्री करताना पालघर जिल्ह्यातील दोघाना अटक "२०००/- रू चलनी दराच्या ८ कोटी रूपये किंमतीच्या बनावट भारतीय चलनातील नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या पालघर जिल्ह्यातील ०२ आरोपींना ठाणे शहर गुन्हे शाखा, युनिट -५ कडुन जेरबंद करण्यात आले आहे.
आठ कोटी रुपयांच्या नकली नोटा विक्री करताना पालघर जिल्ह्यातील दोघाना अटक "२०००/- रू चलनी दराच्या ८ कोटी रूपये किंमतीच्या बनावट भारतीय चलनातील नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या पालघर जिल्ह्यातील ०२ आरोपींना ठाणे शहर गुन्हे शाखा, युनिट -५ कडुन जेरबंद करण्यात आले आहे.
ठाणे: दि. ११, सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथे दोन इसम इनोव्हा कारमधुन बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीलायक बातमी गुन्हे शाखाच्या युनिट - ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ टिम गठीत करून, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथे सापळा लावुन बातमी मधील आशया प्रमाणे १०.४० वा. चे सुमारास आरोपी नामे १) राम हरी शर्मा वय ५२ वर्षे राहणार - एम / ६०३, पेनिन्सुला पार्क, न्यु विवा कॉलेज रोड, बोळींज, विरार वेस्ट, डी. मार्ट जवळ, पालघर २) राजेद्र रघुनाथ राउत वय ५८ राहणार - परनाळी नाका, शिवप्रभा हॉटेल समोर घर नं. २१९ कुरगांव, ता. जि. पालघर, यांना इनोव्हा गाडी नं. एम. एच ०४ डीबी ५४११ सह शिताफीने ताब्यात घेतले असता, त्याचे कब्जात रू. २,०००/- दराच्या वेगवेगळया नंबरच्या नोटा असलेले एकुण ४०० बंडल एकुण रू. ८,००,००,०००/- दर्शनी किं. (आठ कोटी) च्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळुन आल्या. त्याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, सदरच्या बनावट नोटा इसम नामे मदन चौव्हाण याचे मदतीने पालघर येथील गोडावून येथे छापून त्या बनावट नोटा विक्री करण्याकरीता आले आहोत. त्यावरून नमुद आरोपींचे विरुद्ध सहा. पो. निरी. अविनाश रामदास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ३७३ / २०२२ भा.द.वि. कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ३४ अन्वय दिनांक ११/११/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर, नेमणुक गुन्हे , युनिट - ५, हे करीत आहेत. यातील बनावट नोटा या आरोपीत क्र १ राम हरी शर्मा यांचे पालघर येथील टेक इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाळयामध्ये संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने बनविल्या असल्याची माहीती मिळत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. जयजीत सिंग सो, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे सो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री अशोक मोराळे साो, मा. सहा. पोलीस आयुक्त, शोध - १, श्री अशोक राजपुत सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पो. निरी. विकास घोडके, पो. निरी. अरुण क्षिरसागर, सहा. पो. निरी. भुषण शिंदे, स. पो. निरी अविनाश महाजन, पो.उप. निरी शिवाजी कानडे, स.पो.उप.निरी शशिकांत सालदुर, पो. हवा. सुनिल रावते, पो.हवा. रोहीदास रावते, पो. हवा. सुनिल निकम, पो. हवा. संदिप शिंदे, पो. हवा. विजय पाटील, पो. हवा. अजय फराटे, पो. हवा जगदिश न्हावळदे, पो. हवा शशिकांत नागपुरे, पो.ना. तेजस ठाणेकर, पो. ना. उत्तम शेळके, पो.ना. रघुनाथ गार्डे, पो. कॉ. शंकर परब, चालक पो. कॉ. यश यादव या पथकाने केली आहे.
वरिल कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी केलेली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा