Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील काळगाव राम मंदिर सभागृह साठी आ.मंजुळा गावित यांच्या कडून पंधरा लाख रु.श्री.राजधर देसले (माउली)यांचा पाठपुराव्याने मंजूर
साक्री तालुक्यातील काळगाव राम मंदिर सभागृह साठी आ.मंजुळा गावित यांच्या कडून पंधरा लाख रु.श्री.राजधर देसले (माउली)यांचा पाठपुराव्याने मंजूर
गावात दोन वर्षांपूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी आदरणीय आपल्या तालुक्याच्या लाडक्या कर्तव्यदक्ष आमदार ताईसो. मंजुळाताई गावित तसेच डॉ श्री तुळशिरामजी गावित यांनी भेट दिली होती.त्यादिवशी म्हसदी पं.स.सदस्य श्री.राजधर देसले (माऊली) तसेच काळगाव गावातील ह.भ.प मंडळी तसेच ग्रामस्थांनी आमच्या गावातील राम मंदीराच्या प्रांगणात सभागृह करून द्यावे ही मागणी केली होती.ती मागणी ताईंनी 15 लाखांचे सभागृह मंजुर करून दिले आहे. अशा कर्तव्यदक्ष आमदार आपल्या तालुक्याला लाभल्या आहेत की त्यांनी दिलेला शब्द हा पुर्ण करतात.याबद्दल काळगाव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच ह.भ.प मंडळीने ताईंचे आभार व्यक्त केले आहेत.तसेच अशा आमदार साक्री तालुक्याला लाभल्या आहेत अशा कर्तव्यदक्ष आमदार तालुक्याला लाभणे हे साक्री तालुक्याला गौरवास्पद बाब आहे असे उद्गार संपूर्ण ग्रामस्थांच्यावती काढण्यात येत आहे. त्यामुळे काळगाव गावातील सर्व ग्रामस्थांनी ताईंचे आभार मानले.यावेळी ह.भ.प.मंडळी श्री.आत्माराम यादव खैरनार, श्री.अशोक निंबा खैरनार, श्री.विनायक पुंडलिक ठाकरे, श्री.मोठाभाऊ महादु ठाकरे,श्री.आबासाहेब भटू खैरनार, श्री.नानाजी चिमण ठाकरे,श्री.महेश केवळ ठाकरे,श्री.प्रमोद शंकर ठाकरे,श्री.रमेश सदा खैरनार, श्री.भगवान फकिरा ठाकरे,श्री.चिंतामण दयाराम ठाकरे, श्री.गंगाराम राजाराम ब्राम्हणे, श्री.मनोज प्रवीण खैरनार,चि.राकेश शिवाजी खैरनार,श्री.राजधर उत्तमराव देसले (माऊली) आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ताईंचा सत्कार करण्यात आला.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा