Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त...! शहरातील कुस्तीपटूचा पोलीस स्टेशनतर्फे सत्कार...!



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथील अक्षय माळी या कुस्तीपटूची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाल्याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करीत शिरपूर शहरातील एस पी डीएम महाविद्यालयाचा कुस्तीपटू अक्षय भटू माळी याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झाली.त्यानिमित्ताने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अक्षय माळी याचा पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पीएसआय किरण बा-हे,संदीप मुरकुटे,पोहेकॉ हेमंत पाटील, पोकॉ अमोल पगारे,विनोद सरदार विनोद आखडमल, गोविंद कोळी,प्रवीण गोसावी, प्रशांत पवार,आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध