Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

जायंट्स ग्रुप ऑफ शिंदखेडा तर्फे गरजूंना ब्लॅंकेट वाटप...!



शिंदखेडा प्रतिनिधी : शिंदखेडा येथील जायंट्स ग्रुप ऑफ शिंदखेडा तर्फे व मानसी ज्वेलर्स यांच्या सौजन्याने गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. शिंदखेडा शहरातील सामाजिक बांधलकी असलेल्या जायंट्स ग्रुप ने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जायंट्स मेंबरांनी शहरात रात्री दहा वाजेनंतर ग्रस्त घालून दुकानावरील वटयांवर व फूथपात वर झोपलेल्या गरीब,भिकारी यांना कडक्याच्या थंडीत जायंट्स तर्फे मायेची उब मिळावी या हेतूने ब्लँकेट वाटप करण्यात आले. 

त्याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विसपुते,फेडरेशन ऑफिसर प्रा.जितेंद्र पाटील,माजी अध्यक्ष डॉ.देवेंद्र पाटील,
अमोल मराठे,रवी बडगुजर,छोटू राजपाल व चेतन बोधवानी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध