Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! नराधम ‘लव्ह जिहादीं’ना तात्काळ फासावर लटकवा ! जिल्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! नराधम ‘लव्ह जिहादीं’ना तात्काळ फासावर लटकवा ! जिल्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी गुप्ता’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या नावाच्या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. असे अनेक ‘आफताब व सूफियान’ उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध, क्रूर आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला व सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद अर्थांत् ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी धुळे येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, स्वदेशी जागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रशेखर आझाद नगर शिवजयंती उत्सव समिती, राजेश्वर मित्र मंडळ, आद्य श्री शिवछत्रपती गोरक्ष जन आंदोलन, प्रहार अपंग क्रांती संस्था, इंदिरा महिला मंडळ धुळे, श्रीराम सेना नरव्हाळ, प्रभातनगर सांस्कृतिक मित्र मंडळ देवपूर धुळे आणि सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताब व सूफियानला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीही धुळे येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा