Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका ठरतोय गांजा शेतीचे केंद्रबिंदू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांजा शेतीवर छापा टाकून मोठी कारवाई
शिरपूर तालुका ठरतोय गांजा शेतीचे केंद्रबिंदू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांजा शेतीवर छापा टाकून मोठी कारवाई
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी अंतर्गत बेकायदेशीरपणे गांजा शेतीची लागवड केले असल्याच्या गोपनीय माहितीवरून यशस्वी सापडा वाचून तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेख शिरसाठ व त्यांच्या पथकाने कारवाई करून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक १२/११/२०२२ रोजी दुपारी १३.५० वाजेचे सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सपोनि / सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा त्याचे स्वतःचे अर्थिक फायदयासाठी चिलारे गावात टिटवापाणी पाडयाचे शिवारात वन शेतात मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधीत गांज्या आमली पदार्थ वनस्पतिची लागवड केली आहे. अशी बातमी मिळाल्याने, सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो. यांनी मा. पोलीस अधिक्षक सो. धुळे यांना फोनने संपर्क करुन माहिती देवून छापा कारवाई कामी लेखी परवाणगी घेतली. तसेच सपोनि / सुरेश शिरसाठ सो. यांनी छापा कारवाई कामी मा. प्रादेशीक परिवहन अधिकारी श्री धनंजय नारायणराव देवकर सो. सिमा तपासणी नाका, हाडाखेड ता. शिरपूर यांना सोबत घेतले.
तसेच पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंचाना पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले. फोटोग्राफर, वजनकाटा धारक असे सर्व पोलीस स्टेशनला आल्यावर सपोनि सुरेश शिरसाठ यांनी सदर अधिकारी व पंच, फोटो ग्राफर, वजनकाटा धारक यांना वरील बातमीची थोडक्यात हकिगत सांगितली ते छाप्याकामी येण्याची संमती दिल्याने सपोनि सुरेश शिरसाठ व पोलीस स्टाफ असे पोलीस स्टेशन मधून शासकीय वाहनाने चिलारे टिटवापाणी पाडा येथे नाल्या किनारी शेतात जावून १६.४५ वाजता छापा टाकला त्यात इसम नामे हिरालाल व्यंकट पावरा वय. ५२ वर्षे रा. चिलारे टिटवापाणी पाडा ता. शिरपूर जि. धुळे याचे तो कसत असलेल्या वन जमिनीत खालील प्रमाणे मुददेमाल मिळून आला.
१) ७४,००० /- रु. कि. चे एकूण ३७ किलो वजनाचा गांजा सदृश्य आमली पदार्थाचे हिरवे ओले ताजे झाड, पाने, फुले व फांदया असलेले मुळाराह, मुळापासून ते शेडया पर्यंत उंची अंदाजे ५ ते ६ फुटापर्यंत कमी जास्त असलेले मुळास थोडी माती लागलेली प्रति किलो २०००/- रु दराचे अंदाजे.
२) १,३४,००० /- रु. कि. चा २६ किलो ८०० ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगांचा ओला गांजा फुले पाने तोडूनसुकवण्यासाठी पसरवून ठेवलेला प्रति किलो ५०००/- रु. किलो दराचा गांजा
२,०८,०००/- रु. किं.चा गांजा सदर प्रकरणी इसम नामे हिरालाल व्यंकट पावरा वय ५२ वर्षे रा.चिलारे टिटवापाणी पाडा ता.शिरपूर जि. धुळे याने तो कसत असलेल्या शेतात मानवी मेंदूवर करणारे प्रतिबंधीत गांज्या आमली पदार्थ वनस्पतिची लागवड केलेली वनस्पती मुळासकट उपटून जप्त करुन पोलीस स्टेशनला येवून आरोपी नामे हिरालाल व्यंकट पावरा वय ५२ वर्षे रा. चिलारे टिटवापाणी पाडा ता. शिरपूर जि.धुळे याचे विरुध्द शिरपूर तालूका पो. ठाणे गुरन २८१ / २०२२ एन डी पी एस कायदा १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोसई / भिकाजी पाटील यांचे कडेस देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकुंड सो.मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे सो. व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. दिनेश आहेर सो.यांचे मार्गर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि / श्री सुरेश शिरसाठ सो.पोसई / भिकाजी पाटील, पोसई / संदीप मोहन पाटील, पोहेकॉ / संजय काशिनाथ सुर्यवंशी पोना / संदीप देवीदास ठाकरे, पोना / परशुराम पवार पोकों / मुकेश बहादूरसिंग पावरा, पोकॉ / कृष्णा आत्माराम पावरा, पोकॉ/ संजय निंबा भोई, पोकों / योगेश बाळकृष्ण मोरे, चालक पोहेकॉ / सईद रज्जाक शेख, चालक पोकों /रोहिदास संतोष पावरा अश्यांनी सदर कारवाई केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा