Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

खर्दे विदयालयात संविधान दिवस साजरा...!



शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील आर.सी.पटेल माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस साजरा...!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर.साळुंखे होते.सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर विद्यालयाचे शिक्षक श्री ए.जे पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांनी संविधाना साठी घेतलेले अथक परिश्रमावर प्रकाश टाकला. संविधानातील हक्क व अधिकार जसे आपण मागतो तसेच देशाप्रतीही आपले कर्तव्य करायला विसरायला नको हे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी.आर. साळुंखे यांनी संविधानातील विविध कलमे,परिशिष्टे यावर प्रकाश टाकतांना सुजाण नागरिक होण्यासाठी भारतीय संविधान किती महत्वपूर्ण आहे.


हे समजवून सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम‌ती सीमा जाधव व आभार अमोल सोनवणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी बी धायबर, हितेंद्र देसले,ए.जे.पाटील,डी एम पवार, श्रीमती एस.आर.निकम,श्रीमती मनीषा पाटील,श्रीमती सीमा जाधव,बी एस पावरा, बी.एस.बडगुजर, युवराज मीठभाकरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध