Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

दोंडाईचा न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा...!



दोंडाईचा प्रतिनिधी - आज दि. 26 नोव्हेंबर रोजी दोंडाईचा न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.दिवाणी न्यायाधीश श्री.अविनाश क्षीरसागर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.त्यानंतर उपस्थितांनी पाठोपाठ समूह वाचन केले.

29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली.अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने 26 नोव्हेंबर संविधान दिन दोंडाईचा न्यायालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ऍड ई.बी.भावसार,ऍड एन.पी. अयाचित,ऍड डी.व्ही.पाटील,ऍड ए. डी.पाटील,ऍड जे.जे.वाघेला,ऍड आर. एच.धनगर, ऍड टी.बी.ईशी,ऍड एस.ए. माणिक,ऍड सचिन चौधरी,न्यायालयीन कर्मचारी लघुलेखक बी.एन.थोरात, वरिष्ठ लिपिक श्रीमती बी.एन.बागल, कनिष्ठ लिपीक डी. वाय कोळी,
ए.ए.बाह्मणे,एस.बी.भंगी,डी.ए.पगारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध