Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा सीमा तपासणी नाक्यावर २८ लाख ४० हजार रुपये किंमतीची अवैध दारू एलसीबीने केली जप्त..!



नंदुरबार प्रतिनिधी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा सीमा तपासणी नाक्यावर २८ लाख ४० हजार रुपये किंमतीची अवैध दारू एलसीबीने जप्त केली.मुरमुऱ्यांच्या पोत्याखाली लपवून दारूची वाहतूक केली जात होती. वाहनासह एकूण ३८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक फरार झाला.


मर्यादेपेक्षा जास्त भार असलेला ट्रक आला असता पथकासह सीमा तपासणी नाक्यावरील पथकाने त्या वाहनास थांबवून वाहन चालकाला वाहनात काय भरले आहे ? व वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारले यानंतर चालक तेथून पसार झाला.मात्र तपासणी नाक्यावर असलेले सुरक्षारक्षक आणि स्थानिक गुन्हेने विषम विभागाचे पथक असताना देखील चालक फरार कसा झाला आहे; संशोधनाचा विषय असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

अवैध दारू, ट्रक व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील,पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी,हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ,मनोज नाईक,जितेंद्र अहिरराव,अविनाश चव्हाण,किरण मोरे, तुषार पाडवी यांच्या पथकाने केली.

असा आहे मुद्देमाल

वाहनाची तपासणी केली असता त्यात ८ लाख २८ हजार रुपये किंमतीची बिअर, २० लाख १६ हजार रुपयांची व्हिस्की, २६ हजार ४०० रुपयांचे मुरमुरे व १० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ३८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध