Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील 2 बोगस डॉक्टरांविरुद् फौजदारी गुन्हा दाखल
शाहदा प्रतिनिधी दिनांक 22/08/2022 रोजी सुलतानपुर ता. शहादा येथील एका अल्पवयीन मुलीची प्रकृती बरी नसल्याने त्या मुलीच्या पालकांनी तिला सुलतानपुर गावातीलच मंगलाई क्लिनिकमध्ये औषधोपचाराकामी नेले होते.मंगलाई क्लिनिकमधील डॉ.राजेंद्र पाटील व त्यांचा मुलगा डॉ.विनोद पाटील यांनी अल्पवयीन मुलीची तपासणी करुन तिचेवर औषधोपचार केले,परंतु त्या अल्पवयीन मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या पालकांनी तिला पुन्हा मंगलाई क्लिनिकमध्ये घेवून गेले.डॉ. राजेंद्र पाटील व व त्यांचा मुलगा डॉ. विनोद पाटील यांनी त्या अल्पवयीन मुलीला धुळे येथे घेवून जाणे बाबत सल्ला दिला म्हणून त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिला धुळे येथे घेवून गेले होते.
परंतु धुळे येथे औषधोपचारादरम्यानच त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यु झाला.
सदरची घटना घडल्यामुळे मृत मुलीच्या नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी मंगलाई क्लिनिकमधील डॉ.राजेंद्र पाटील व व त्यांचा मुलगा डॉ.विनोद पाटील यांचेविरुध्द् कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर डॉ. राजेंद्र पाटील व डॉ.विनोद पाटील यांनी केलेल्या उपचाराबाबत समिती गठन करण्यात आली.
त्याअनुषंगाने शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधीकारी श्री. श्रीकांत घुमरे व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निवृत्ती पवार यांनी मृत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांची समजूत काढून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मृत अल्पवयीन मुलीवर अंत्यसंस्कार केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी मंगलाई क्लिनिकमधील डॉ.राजेंद्र पाटील व व त्यांचा मुलगा डॉ.विनोद पाटील यांचे वैद्यकीय परवाना / नोंदणी याबाबत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांचेकडेस पाठपुरावा केला असता डॉ. राजेंद्र पाटील व व त्यांचा मुलगा डॉ.विनोद पाटील यांचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना / नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर 1) डॉ. राजेंद्र ऊर्फ राजु श्रीपद पाटील वय-54 2 ) डॉ. विनोद राजेश (राजेंद्र पाटील वय 31 दोन्ही रा.सुलतापुर ता.शहादा जि. नंदुरबार ह.मु.साई सेवाराम नगर शहादा जि.नंदुरबार यांचेविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे 271/2022 भादंवि कलम 304, 419, 420,276, 34 सह महा. वैदयकीय अधि 1961 चे कलम 33 33 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना दिनांक 06/11/2022 रोजी अटक करण्यात आलेली आहे व त्यांना 04 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी असे आवाहन केले आहे की, आपल्या आजू बाजूला कोणी बोगस वैद्यकीय अधिकारी असेल तर तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा