Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

कर्म.शंकरराव चिंधूजी बेडसे माध्य.विद्यालय धाडणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा



संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन डॉ भूषण अहिरराव यांनी केले.
साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, कर्मवीर शंकरराव चिंधुजी बेडसे विद्यालय धाडणे येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्रसंगी मुख्याध्यापक प्रमोद बेडसे, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. भुषण अहिरराव पुढे म्हणाले की, २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक प्रमोद बेडसे यांनी भारतातील विविध जाती, धर्म व पंथांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केलेली आहे असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन देखील करण्यात आले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध