Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
जन ग्रामीण पत्रकार संघाची साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर प्रकाश वाघ यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
जन ग्रामीण पत्रकार संघाची साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर प्रकाश वाघ यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
साक्री प्रतिनिधी– पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन झालेल्या जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून त्यावर चर्चा करण्यासाठी साक्री विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जन ग्रामीण पत्रकार संघाची साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार जी.टी. मोहिते,सतीश पेंढारकर आणि विद्यानंद पाटील यांची धुळे जिल्हा कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली.तसेच तालुका कार्यकारिणी मध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वाघ यांची अध्यक्ष तर अरुण अहिरराव यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शैलेंद्र साळे यांनी पत्रकारांच्या वाटेला येणारा संघर्ष आणि काळानुरूप बदलती पत्रकारिता लक्षात घेऊन पत्रकारांचे ज्ञान अद्यायवत करण्यासाठी जन ग्रामीण पत्रकार संघ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल याची ग्वाही दिली.
त्यानंतर कार्याध्यक्ष युवराज देवरे यांनी जन ग्रामीण पत्रकार संघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांच्या समस्या लक्षात घेऊन पत्रकार संघाची गरज नमूद केली. तसेच जन ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे यांनी पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा सांगत पत्रकारांना संघटीत होण्याचे आवाहन केले.
जन ग्रामीण पत्रकार संघ साक्री तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या निवारणासाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत झालेली नियुक्ती सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.जन ग्रामीण पत्रकार संघ साक्री तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
तालुकाध्यक्ष - प्रकाश वाघ
कार्याध्यक्ष - अरुण अहिराव
उपाध्यक्ष - अकील शहा
शहराध्यक्ष - जितेंद्र जगदाळ
शहर उपाध्यक्ष - संघपाल मोरे
तालुका संघटक - उमाकांत अहिरराव,सहसंघटक - रतिलाल सोनवणे,सचिव - खंडेराव पवार
कोषाध्यक्ष - कल्पेश मिस्तरी
प्रसिद्धी प्रमुख- चंद्रशेखर अहिरराव
निजामपुर जैताणे विभाग प्रमुख - विकास महिरे,दहिवेल विभाग प्रमुख राहुल राठोड, पिंपळनेर विभाग- प्रमुख - तुषार ढोले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा