Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

शिंदखेडा तहसील आवार अतिक्रमण च्या विळख्यात..! तक्रारदार यांची लोकायुक्त कडे तक्रार..! अतिक्रमण धारकाकडून तक्रारदारास भावनिक ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न..!



शिंदखेडा तहसील आवार अतिक्रमण च्या विळख्यात..! तक्रारदार यांची लोकायुक्त कडे तक्रार..! अतिक्रमण धारकाकडून तक्रारदारास भावनिक ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न..!

शिंदखेडा प्रतिनिधी :- शिंदखेडा तहसीलदार आवारात पत्राशेड बांधून 8 दुकानाचे अतिक्रमण करण्यात आलेले होते.सदर अतिक्रमण काढण्यात यावे म्हणून शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार यांच्या पासून जिल्हाधिकारी,धुळे,विभागीय आयुक्त नाशिक सह महसूल विभागातील सचिवांकडे तक्रार करण्यात आलेली होती.सदर पुरावा निशी तक्रार करून देखील शासन यंत्रणा अतिक्रमण काढीत नसल्याने तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त कडे तक्रार दाखल केलेली आहे. 

सर्व विषय महसूल प्रशासनास कळल्यावर अतिक्रमण धारकाकडून तक्रारदारास भावनिक ब्लॅकमेलिंग केले जात होते.तसेच शिंदखेडा तालुक्यातील एका पुढाऱ्यांच्या पिय कडून दम दिला गेला होता.अशी एकंदरीत परिस्थिती असतांना निव्वळ देखावा म्हणून अतिक्रमण धारकाकडून फक्त अतिक्रमण काढल्याचा देखावा म्हणून शटर काढण्यात आले आहे बाकीचे अतिक्रमण जैसेथे आहे.

संबंधित तहसीलदार यांनी देखील दोन नोटीसा अतिक्रमण धारकांना दिल्या असल्याची चर्चा आहे. मंडळ अधिकारी यांनी देखील त्याचा दुजोरा दिला असून लवकरच संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे सदर प्रकाराबाबत तक्रारदार यांनी शासनाकडून योग्य कार्यवाही होईल अशी आशा व्यक्त केली गेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध