Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

हिंदुत्ववादी संघटनांची मागणी शिरपूर शहरातून हिंदुत्ववादी संघटनांची भव्य निषेध रॅली व निवेदन..! धर्मांध आफताबला त्वरित फाशी द्यावी व धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्र सह सर्व राज्यांना लागू करावा तसेच लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करा -



शिरपूर प्रतिनिधी - धर्मांध आफताबला त्वरित फाशी द्यावी व धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्र सह सर्व राज्यांना लागू करावा तसेच लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा करावा यासह इतर मागण्यांसाठी शिरपूर शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत भव्य असा मोर्चा काढून देशात झालेल्या प्रकरणांबाबत तीव्र अशा भावना व प्रतिक्रिया व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला व आपल्या विविध मागण्यांसाठी पंतप्रधान मुख्यमंत्री यांचा सह शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून हिंदुत्ववादी संघटनांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य करण्यासाठी विनंती करण्यात आली.

नुकतीच देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आफताब पूनावाला या विकृत मानसिकतेच्या धर्मांध तरुणाने श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीच्या देहाचे ३५ तुकडे करत हत्या केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून योजनाबद्ध रीतीने तिचा खून करण्यात आला. वरवर पाहता हि प्रेम प्रकरणातील घटना दिसत असली तरी हि खरेतर लव्ह जिहाद च्या जिहादी मानसिकतेतून झाली आहे.

सदर घटना हि पहलीच घटना नव्हे लव्ह जिहादचे प्रकरण हि नित्याची बाब झालेली आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, शारीरिक संबंध प्रस्थापित करून, त्याचे व्हिदिओ बनवून ब्लैक मेल करणे, किंवा लग्नाचे आमिष दाखवून प्रसंगी लग्न करून बळजबरीने धर्मातरण करणे, हवा तसा उपहोग घेताल्यानान्तार्त्यांची हत्या करणे किंवा देहविक्री, जिहादसाठी आतंकवादी कारवाया त्यांच्याकडून करून घेणे, या सर्व गोष्टीसाठी लव्ह जिहाद केला जात असल्याचे दिसून आलेले आहे. हि बाब केरळमधील मा. न्यायाधीश यांच्यामार्फत करण्यात आलेल्या सर्वेतून निदर्शनास आलेली आहे. 

तसेच राज्य विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए एन मित्तल यांनी २६८ पानांचा अहवाल सादर केलेला आहे. धर्मातर विरोधी कायदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडीसा, गुजरात, छत्तीसगढ़, झारखंड वगैरे राज्यात अस्तित्वात असून कर्नाटक व हरियाणा राज्याने कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केलेली आहे. 

जगात पाकिस्तान श्रीलंका वगैरे देशात सदर कायदा अस्तित्वात आहे. मात्र भारतात त्याची सक्षमपणे अंमलबजावणी होवून सर्व राज्यात सक्तीचा नाही हा विरोधाभास आहे.

साठी खालील प्रमुख मुद्द्यांकडे लक्षवेधून याबाबत सरकार म्हणून कारवाई करण्याचे आश्वासन व प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली.

प्रमुख मुद्दे

1. मुलींना धार्मिक व सामाजिक शिक्षण शाळा कॉलेजमधून देऊन त्यांचे प्रबोधन करणे

2. टीव्ही सिरीयल सिनेमा याबाबत सेन्सर बोर्डाचे नियम कडक करणे

3. अल्पसंख्याकांप्रमाणे बहुसंख्य लोकांना धर्माचे शिक्षण शाळा कॉलेजमधून देण्यास परवानगी मिळणे.

4. भारतीय संविधानाचे आर्टिकल 30 व 30 अ यात संशोधन करून सर्वधर्म समभाव ही संकल्पना रूढ करावे.

5.निसर्ग नियमानुसार व परंपरेनुसार स्त्री व पुरुषाच्या लग्नाच्या वयाबाबत फेरविचार करावा.

6. लैंगिक शिक्षण शाळा कॉलेजमधून सक्तीने देण्यात यावे

7. संविधानानुसार कायद्यापुढे सर्व समान, हे धोरण खऱ्या अर्थाने राबवण्यात यावे जातीनिहाय कायदे बंद करण्यात येऊन समान नागरी कायदा अमलात आणावा,

8. अल्पसंख्यांक व बहुसंख्यांकवाद संपण्यासाठी समान नागरी कायदा सक्तीने अमलात आणावा. 

9. जातिभेद वर्णभेद यांना कायद्यात स्थान असू नये असे कायदे रद्द करावे

10. नव्याने जनगणना करण्यात यावी

11. श्रद्धा वालकरच्या खुन्यास तीन महिन्याच्या आत फाशी देऊन कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी.

सदरच्या निवेदनावर शेकडो सकल हिंदू व समस्त हिंदू संघटना विविध राजकीय संघटना व सामाजिक संघटना विश्व हिंदू परिषद हिंदू जागृत मंच, धर्म जागरण मंच, शिवप्रतिष्ठान व वारकरी इत्यादी सर्व हिंदू धर्म सर्व समावेशक संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध