Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत शिरपूर आणि धुळे येथे युवा स्पोर्टिफेस्ट 2022 चे आयोजन..!
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत शिरपूर आणि धुळे येथे युवा स्पोर्टिफेस्ट 2022 चे आयोजन..!
शिरपूर प्रतिनिधी : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत शिरपूर आणि धुळे येथे युवा स्पोर्टिफेस्ट 2022 चे आयोजन करण्यात आले असून 12 व 14 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी 12 विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत.विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी 5 डिसेंबर 2022 पर्यंत खेळाडूंनी शाळेमार्फत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एस.व्ही.के.एम.संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण,क्रीडा व युवा कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते. यावर्षी फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल,हॉलीबॉल,रेसलिंग, स्विमिंग,बॉक्सिंग, कबड्डी,कॅरम,टेबल टेनिस,लॉन टेनिस, ऍथलेटिक्स या 12 क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिरपूर व धुळे येथे एस.व्ही.के.एम.संस्थेतील विविध शाळांमध्ये करण्यात आले आहे.
या स्पोर्ट्स कार्निव्हलसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.सदर स्पोर्ट्स कार्निव्हल मार्फत खेळाडूंना सुवर्ण संधी प्राप्त झाली असून त्यांना या स्पर्धांमधून लक्ष केंद्रित करण्याची,खूप काही शिकण्याची आणि दृढ निश्चय व खिलाडूवृत्ती विकसित करण्याची संधी प्राप्त होणार आहे.यात अनेक ट्रॉफी,पदके आणि प्रमाणपत्रे देवून खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.
इच्छूक खेळाडू विद्यार्थ्यांनी स्पर्धा नावनोंदणी करावी. युवा स्पोर्टिफेस्ट 2022 मध्ये विविध शाळांमधील जास्तीत जास्त खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. अंतिम तारीख 5 डिसेंबर 2022 असून https://forms.gle/bKvya44DSnVgbydJ8 या गुगल फॉर्मची लिंक भरावी. तसेच अधिक माहितीसाठी एस.व्ही.के.एम. सहाय्यक क्रीडा संचालक अभय कचरे (मोबा. 99706 00437) यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल yuvasportifest@gmail.com करावा.
कोणतीही शाळा या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कितीही संघ पाठवू शकते. सहभागी संघांनी स्पर्धेच्या नियोजित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी स्पर्धेच्या ठिकाणी अहवाल देणे आवश्यक आहे. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे, पदकांच्या स्वरूपात पुरस्कार दिले जातील. मुला-मुलींसाठी प्रवेश अर्ज स्वतंत्रपणे भरणे आवश्यक आहे. नोंदींच्या संख्येनुसार स्वतंत्र फॉर्म भरा. एंट्री फॉर्म रीतसर भरलेला, शिक्का मारलेला आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
धुळे येथे एस. व्ही. के. एम., मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग 3, गुरुद्वाराच्या बाजूला, तसेच शिरपूर-चोपडा रोड, प्रियदर्शिनी सूतगिरणी समोर मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल, तांडे ता. शिरपूर व मुकेशभाई आर. पटेल मुला-मुलींची मिलिटरी स्कूल आणि ज्यु. कॉलेज तांडे. ता. शिरपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात.
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ युवा स्पोर्टीफेस्ट 2022 चे उद्घाटन 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता शिरपूर शहरातील अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या भव्य मैदानावर होणार आहे.
त्यानंतर 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत शहरातील अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल तसेच तांडे येथील मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या भव्य मैदानावर व मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल मध्ये विविध स्पर्धा संपन्न होतील. धुळे येथे एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूल येथे टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात येतील.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा