Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

आर.सी.पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शाळेची शैक्षणिक सहल.



     
शिरपूर प्रतिनिधी:आज दिनांक 03 डिसेंबर 2022 शनिवार रोजी आर.सी.पटेल प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शाळेची शैक्षणिक सहल शिरपुर रिक्रिएशन गार्डन येथे आयोजित करण्यात आली. 
   

नर्सरी ते इयत्ता चौथीच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गार्डनमधील सर्व पाळणे ,मिकी माउस,फ्रॉग जंप अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी धम्माल केली.
  

त्यानंतर इतर खेळ खेळून उत्साहात सहलीचा आनंद घेतला.यावेळी मुख्याध्यापक गोपाल पाटील ,श्रध्दा भावसार,उज्वला दायमा,शिंदे स्नेहल,दिपीका पाटील,वैशाली सोनवणे,संगीता जाधव व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचा_यांनी सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध