Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धीतर्फे शिरपूर तालुक्यातील 64 शेत/पाणंद रस्त्यांसाठी 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर....
आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धीतर्फे शिरपूर तालुक्यातील 64 शेत/पाणंद रस्त्यांसाठी 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर....
शिरपूर प्रतिनिधी : आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धीतर्फे शिरपूर तालुक्यातील 64 शेत/पाणंद रस्त्यांसाठी 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या शेत स्त्यांमुळे शेतकरी बांधव व ग्रामस्थांसाठी चांगले रस्ते उपलब्ध होणार आहेत.
हे सर्व रस्ते दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावेत अशा सक्त कडक सूचना संबंधितांना माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिल्या आहेत.
माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते सहमती प्रदान कामांची यादी 23 डिसेंबर 2022 रोजी मंजूर करण्यात आली असून शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी 1 किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्याला 24 लाख रुपये याप्रमाणे 64 शेत/पाणंद रस्त्यांसाठी सुमारे 15 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते सहमती प्रदान कामांची शिरपूर तालुक्यातील मंजूर गावांची यादी पुढील प्रमाणे असून प्रत्येक गावासाठी 1 किलोमीटर लांबीचा 24 लाख रुपये खर्चाचा शेत/पाणंद रस्ता तयार करण्यात येणार आहे.
गावांची नावे जळोद (उखळवाडी) साठी एक, जळोद (उखळवाडी) साठी दुसरा रस्ता, अर्थे खुर्द, बलकुवेसह मुखेड, नवे भामपूर, हिसाळे, अजंदे खुर्द, निमझरी, जुने भामपूर, हिंगोणी, करवंद, वरझडी, शिंगावे, कळमसरे, उमरदा, वकवाड, अंतुर्ली, तऱ्हाडी, जवखेडा, वरुळ, तोंदे, तरडी, भावेर, बुडकी, टेंभेपाडा, न्यू बोराडी, रोहिणी, आंबे, हिवरखेडा, ताजपुरी, थाळनेर, दहिवद, लौकी, सांगवी एक, सांगवी दुसरा रस्ता, खंबाळे, जातोडे, टेंभे, चांदपुरी, बाभुळदे, सुभाष नगर, वाडी बुद्रुक, वाडी खुर्द, घोडसगाव, होळ, भोरटेक, मांजरोद, फत्तेपूर फॉरेस्ट एक, फत्तेपूर फॉरेस्ट दुसरा रस्ता, बोराडी साठी एक, बोराडी साठी दुसरा रस्ता, उंटावद, खर्दे बुद्रुक, वाठोडे, पिळोदा, जापोरा, कुवे, थाळनेर, शिंगावे, अजंदे खुर्द, टेंभे, सुभाष नगर, वाघाडी, भाटपुरा याप्रमाणे या गावांसाठी 64 रस्ते मंजूर झाले आहेत.
हे सर्व रस्ते फार अथक प्रयत्नाने मंजूर झाले असून अतिशय चांगल्या दर्जाचे व क्वालिटीचे रस्ते होण्यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी लक्ष घालावे. ग्रामपंचायत, शेतकरी व ग्रामस्थ यांनी देखील जागृत राहून सदर रस्ते गुणवत्तापूर्ण होण्याबाबत लक्ष घालावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा