Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर आमदार कार्यालयात आ.अमरिशभाई पटेल यांच्या उपस्थितीत सुशासन दिवस साजरा...



शिरपूर प्रतिनिधी : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन सुशासन दिवस साजरा करण्यात आला.

शिरपूर शहरातील आमदार कार्यालयात 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता सुशासन दिवस कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील,माजी नगरसेवक अशोक कलाल,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भटू माळी मांडळ,संजय चौधरी, हर्षल गिरासे, रज्जाक कुरेशी,सलीम खाटीक,राजू शेख, सुरेश अहिरे, नवल वंजारी, सुनील जैन,किशोर माळी, योगेश्वर माळी,भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल व आमदार कार्यालयातील विकास योजना आपल्या दारी अभियानची स्वयंसेवक टीम,अनेक मान्यवर,नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध