Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

अखेर हावश्या-नवश्या-गौवश्याचे मैदानातून पलायन , निवडणुकीत मतदार राजा हा सुर्य व हा जयद्रत केल्याशिवाय राहनार नाही...



शिरपूर: शिरपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल १२२ उमेदवारांनी सरपंच पदासाठी अर्ज केलेले होते.तर ६७४ उमेदवार सदस्य पदासाठी होते. त्यातच थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होत असल्याने सरपंच पदासाठी उमेदवारांची संख्या ही अधिक दिसून येत होते.मात्र माघारी नंतर ब-याचश्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे उमेदवारांनी माघारी घेतल्याने खरे मातब्बरच रिंगणात उरलेले आहे.यात जवळ-जवळ आजी-माजी सरपंच व उपसरपंच हे स्वत: तर काही ठिकाणी त्यांचे प्रतीनिधी उभे केलेले आहे.



त्यामुळे सरपंच पदाची निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट दिसून येत आहे.तर माघारी घेणा-यामध्ये काहीनी इतरांचा मान ठेवत माघार घेतली,काहीनी निवडणुकी नंतरची आश्वासने घेऊन माघार घेतली,तर स्वत:ला गावातील धुरंधुर राजकारणी असल्याचे भासवत मैदानात उतरले,आणि आपल्या कोणाकडू काही तरी मिळते का... सकाळ-संध्याकाळ पुरते..आश्या अपेक्षेने उमेदवारी अर्ज टाकलेल्या हावश्य-नवश्या-गौशांनी सरळ सरळ मैदानातुन माघार घेत पलायन केले. मग आता आपल्याकडून तर काहीच होणार नाही,व आगोरदच आपल्या जेम-तेम स्वत:चे व आपल्याच घरातील लोकांचे मते मिळतील की नाही असी शंका असलेल्यांनी मैदानातून माघार घेतली,पण 'कुत्र्याची शेपटी नळीत टाकली तरी वाकडी ती वाकडीच,' मग अस्श्यांनी आपले काहीतर अस्तीत्व दाखवण्यासाठी दुस-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचे राजकारण करत असल्याचे चित्र दिसून येत.याला म्हणतात 'आईजीच्या जिवावर बाईजी उदार.' हरकत नाही.नाही तरी मतदार राज्या मतदानातून 'हा सुर्य व हा जयद्रत' केल्याशिवाय राहणार नाही.    

नेहमी गावात राहून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी अर्ध्यारात्री धावून जाणारे व मदतीसाठी उभे राहणारे, गोरगरीबासाठी आपल्या बाप दादाची मालमत्ता देखील दान करणारे, अत्यंत राजेशाही व गर्भश्रीमंती असतांना देखील सर्वसामान्याच्या घरासमोरील तुटाक्या फ़ुटाक्या खाटेवर कोणताही मोठापणा न दाखवत तेथे बसून जनतेचा हालहवाल विचारणारे, अठाराविश्व दारिद्र असणा-याच्या घरी थांबून त्याच्या हाताची चहा पिणारे, व आपल्या जनतेसाठी सत्याधा-यांना ग्रामसभेत जाब विचारणारे, केवळ गावाचा व तेथील जनतेचा विकास व केवळ विकास हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवणारे यासाठी स्वत:चे नुकसान झाले तरी चालेले अश्या भावनेने काम करणारे विकास पुरुष देखील आहेत. 

मग अश्या निस्वार्थी,महान व थोर व्यक्ती आज यांच्या मार्गदर्शनाने त्यांची पुढील पिडी त्यांचे स्वप्न पुर्तीसाठी जर अश्या निवडणूकीच्या मैदानात उतरलेले असतील तर गावातील मतदार प्रथम त्यांचाच विचार नक्कीच करणार.यात कोणतीही शंका नाही. केवळ पाच वर्ष आपला खिसा भरणारे व शेवटी-शेवटी आपल्या ग्रामपंचायतीत झालेल्या अर्जफ़ाट्यामुळे  निवडणुकीपुर्वी आम्ही खूपच कामे करत असल्याचे भासविणा-या लबाडांना जनता घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे राजकारणी व्यक्तीने प्रथम गावाचा विकास, दिलेले वचने पुर्ण करणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.या 21 व्या शतकातील मतदार राजा आता हुशार झाला आहे.हे समजून घ्यावे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध