Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त..! मानवता जागृती रॅलीचे आयोजन...!

     

पिंपळनेर प्रतिनिधी - येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, ग्राहक फाउंडेशन साक्री तालुका , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर च्या वतीने व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक माननीय श्री.कांतीलालजी जैन साहेब ,माननीय श्री.सुभाषजी बसवेकर साहेब,व अॅड.श्री.चंद्रकांत एशीरावसाहेब यांच्या आदेशानुसार जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवता जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. 


कर्म.आ.मा पाटील विद्यालयाचे उपाध्यक्ष माननीय श्री.सुरेंद्रदादा मराठे साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे साहेब ,श्री.ए बी मराठेसर ,प्राचार्य श्री.मनोज बिरारीसर व श्री.संजीव खैरनार साहेब,श्री.प्रशांत अग्रवाल साहेब यांनी हिरवे झेंडे दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. 


रॅली कर्म. आ.मा पाटील विद्यालयापासून बस स्टॅन्ड ,सटाणा रोड,गोपाळ नगर,मेन बाजार पेठ ,गांधी चौक मार्गे,कर्म.आ मा पाटील विद्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे सल्लागार श्री.संजीव खैरनार साहेब, जिल्हा संघटक श्री. प्रशांत अग्रवाल साहेब,पिंपळनेर शहराध्यक्ष श्री.प्रविण थोरात, श्री.हंसराजजी शिंदे, श्री.रावसाहेब शिंदे,श्री.चंद्रकांत अहिरराव,श्री.दिनेश भालेराव ,श्री. उमेश गांगुर्डे,श्री.धनंजय देवरे, श्री.किरण शिनकर,श्री.भरत बागुल , श्री.राजेंद्र भामरे ,श्री.अनिल महाले, श्री.पराग महाजन,श्री.सोमनाथ बागुल , श्री.भूषण चव्हाण, श्री.कन्हैयालाल गांगुर्डे, प्रा.ए एन देवरे, प्रा.डि एन बर्डे, प्रा.एस एम भदाणे ,व कर्म.आ.मा पाटील विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ,पिंपळनेर पोलीस स्टेशन चा स्टॉप, पिंपळनेर व टेंबा प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ,या सर्वांचे रॅली यशस्वीते साठी विशेष सहकार्य लाभले. उपस्थित सर्वांचे श्री.अनिल महाले सर यांनी आभार मानुन रॅलीच्या कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध