Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
चोपडा शहरातील वाळू चोरीची टीप देतो या कारणावरून एकास मारहाण ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल….!
चोपडा शहरातील वाळू चोरीची टीप देतो या कारणावरून एकास मारहाण ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल….!
चोपडा प्रतिनिधी :-चोपडा शहरातील गोरगांवले रोड वरील हॉटेल नाना का ढाबा जवळ फिर्यादी कुणाल प्रदिप पाटील रा.पाटीलगढी हा महसुल व पोलीस विभागाला रेती चोरीच्या टिप देतो या कारणावरुन फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, लाकडी काठी तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.म्हणून ९ जणांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, लाकडी काठी, होंडा हॉर्नेट मोटारसायकल, बजाज प्लॅटीना मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. १५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गोरगावले रोडवरील हॉटेल नाना का ढाबा जवळ आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन,फिर्यादीस महसुल व पोलीस विभागाला,आमच्या रेती चोरीच्या टिपा का देतो? या कारणावरुन फिर्यादीस तुला खुप माज आला आहे,तुला तुझा जिव प्यारा नाही का,तुला संपवुन टाकतो अशी शिवीगाळ,दमदाटी करुन सर्व ९ आरोपींनी फिर्यादीस चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.आरोपी दिगंबर रविंद्र सोनवणे याने भगव्या रंगाच्या होंडा हॉर्नेट मोटार सायकलीस लावलेला लोखंडी रॉड काढुन,लोखंडी रॉडने फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारुन दुखापत केली.तसेच आरोपी सागर रविंद्र सोनवणे याने बाजुस उभी असलेल्या प्लॅटीना मोटार सायकलला बांधलेली लाकडी काठी काढून त्याने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करुन दुखापत केली म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा रजि. नं. ५१८/ २०२२ भादंवी कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ नुसार ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे…
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा