Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : 12 ढाबा चालकांसह 31 मद्यपींवर 91 हजारांची दंडात्मक कारवाई
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : 12 ढाबा चालकांसह 31 मद्यपींवर 91 हजारांची दंडात्मक कारवाई
जळगाव प्रतिनिधी:ग्रामपंचायत निवडणूक भुसावळ विभागात ढाबा चालकांसह मद्यपींची कारवाईने उतरली झिंग
साठी आखाडा पेटला असताना अवैधरीत्या मद्य विक्रीलादेखील ऊत आला आहे.या अनुषंगाने भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्टीव्ह मोडवर आला असून आतापर्यंत 12 ढाबा चालकांसह 31 ग्राहकांवर कारवाई करीत 91 हजारांचा दंड वसुल करण्यात आल्याने मद्यपी ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. परवान्याविना दारू विक्री करणारे ढाबे चालक तसेच ग्राहक विभागाच्या रडारवर असून गावठी दारूलादेखील मोठ्या प्रमाणावर या विभागाने पायबंद घालण्यात यश मिळवले आहे.
निवडणूक पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशान्वये 17 व 18 डिसेंबर रोजी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार असून ग्रामपंचयत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी होईपर्यंत अबकारी अनुज्ञप्ती बंद असणार आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरीत्या ढाब्यांमध्ये मद्य विक्री केली जात असल्याने जळगाव जिल्ह्यात पाच विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
91 हजारांचा दंड वसूल
जिल्ह्यातील भोलाणे, देऊळवाडे, रायपुर, सावतर निंभोरा, धरणगाव, जळगाव कंजरवाडे, धानोरा, उदळी, नारखेडा, सायगाव, तामसवाडी या ठिकाणी हातभट्टी निर्मितीवर कारवाई करण्यात आली तर जळगाव किनोद, धरणगाव, चोपडा, वाकोद, वरखेडी, अमळनेर आदी ठिकाणी ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 68 प्रमाणे 12 ढाबा चालक व 31 मद्य पिणार्या ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांना न्यायालयात 91 हजारांचा दंड सुनावण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सी.एच.पाटील, निरीक्षक सुजित कपाटे,निरीक्षक अन्वर खतीब, विलास पाटील,आनंद पाटील,चेतन शिंदे, शिवबा भगत, सोमनाथ शेलार, सतीश पाटील,अमोल भडागे,सोनार देवदत्त पाचपोळ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, ईश्वर बाविस्कर, नरेंद्र पाटील, मुकेश पाटील, अजय गावंडे प्रतिकेश भामरे, दिनेश पाटील, सत्यम माळी,धनसिंग पावरा,प्रकाश तायडे, शशीकांत पाटील,नितीन पाटील, सागर देशमुख,योगेश राठोड,विठ्ठल हटकर,भूषण परदेशी,अमोल पाटील, विजय परदेशी,नंदु नन्नावरे, गोकुळ अहिरे आदींच्या पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा