Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

साक्री तालुक्यातील शेणपूर येथे अखिल भारतीय वंजारी सेवा संघाचे फलक अनावरण सोहळा व लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे साहेबाची जयंती साजरा करण्यात आली


साक्री तालुक्यातील मौजे शेणपूर येथे समस्त वंजारी समाज बांधवांनी आज दि.12/12/2022 रोजी अखिल भारतीय वंजारी सेवा संघ (महाराष्ट्र) या नवीन फलक अनावरनाचे आयोजन केले होते. लोकनेते माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या 73 व्या जयंतीचे अवचित्य साधून या निमित्ताने शेणपूर गावात श्री.भगवान बाबा व गोपीनाथजी मुंढे साहेब यांचा फलकाचे अनावरण साक्री येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व भाजप नेते माननीय श्री.बापूसाहेब पुंडलिक गीते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांचा सोबत साक्री नगर पंचायतीचे सदस्य महेंद्र देसले,दीपक वाघ,विकास गिते,
गोकुळ आवारे,भीमराव उबाळे,डॉ.महेंद्र काळे,ग्रामसेविका सौ.उज्वला निकम या सर्व प्रमुख पाहुण्यांचे गावातील समाज बांधवांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.बापूसाहेब गिते याना देण्यात आले तसेच मुंढे साहेबांचा जीवनावर आधार त्यांचा राजकीय व सामाजिक जीवनात त्यांचा वावर कसा होता या विषयावर सुंदर असे व्याख्यान कुमारी सविता आघाव शेणपूर हिने केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेणपूर हायस्कुलचे माझी मुख्याध्यापक श्री.आर.एस.शिंदे यांनी केले या सर्व कार्यक्रमाचे आयोजक शेणपूर वंजारी समाज मंडळ व त्यांचे पदाधिकारी यांची विशेष सहकार्य लाभले त्यात सरपंच श्री चंद्रकांत काळे,निशिकांत जैन,शेतकरी संघटनेचे गंगाधर काळे,उत्तर महा.वंजारी सेवा संघ संघटक श्री.पंडितराव काळे,
वि.वि.का.सो.सदस्य श्री.रवींद्र काळे,प्रगतिशील शेतकरी सुनील काळे,पोलीस पाटील हेमराज काळे,महेंद्र घुगे,भरत काळे,देविदास आघाव,शैलेंद्र काळे,नंदकिशोर काळे,अनिकेत काळे,रितेश काळे,मयूर काळे,पुष्कर काळे,ओम काळे,प्रशांत काळे,आदींचे सहकार्य लाभले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध